“आरोपाला कामांनी उत्तर देऊ”; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं…
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यापासून ते संजय राऊत या नेत्यापर्यंत सगळ्यांकडून राज्य सरकारसह केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.
मुंबईः खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्याबाबतचे पत्रही संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांसह गृहमंत्र्यांनीही दिले होते. याप्रकरणावर मुख्यमंत्र्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी यावर काही बोलण्यासारखे नाही. कारण ठाकरे गटासह संजय राऊत अगदी न्यायव्यवस्थेपासून ते निवडणूक आयोगापर्यंत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे त्याविषयी न बोललेच बरे अशा शब्दात संजय राऊत यांच्या आरोपांना त्यांनी उडवून लावले आहे.
खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र या आरोपाची सखोल चौकशी केली जाणार आहे. आताच्या काळात कोणावरही बिनबुडाचे आरोप करता येणार नाहीत.
राज्यातील कायदा व्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी जे आरोप केले आहेत.त्याची गृहविभागातर्फे चौकशी केली जाणार असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यापासून ते संजय राऊत या नेत्यापर्यंत सगळ्यांकडून राज्य सरकारसह केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या पंतप्रधानांमुळे देशातील जनसामान्य माणूस मुख्य प्रवाहात आला आहे. तरीही विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र आता विरोधकांना टीका करतात तर करू द्यावी आम्ही मात्र आमच्या कामांतून त्यांना उत्तर देऊ अशा शब्दात विरोधकांना त्यांनी टोला लगावला आहे.
खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते आरोप त्यांनी का केले आहेत. त्याची चौकशी केली जाणार असून त्यासाठी गृहविभागातर्फे चौकशी करून त्याचा तपास केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.