निरोपाचं अधिवेशन म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर, म्हणाले….

राज्यात विधीमंडळाचं अधिवेशन 27 जून म्हणजेच उद्या गुरूवारपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या एक दिवसाआधी सत्ताधारी विरोधकांना चहापानाचं निमंत्रण देतात. पण चहापानावर सत्ताधाऱ्यांनी बहिष्कार टाकला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेतली.  यावेळी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

निरोपाचं अधिवेशन म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर, म्हणाले....
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 26, 2024 | 8:48 PM

पावसाळी अधिवेशनाआधीच सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. या अधिवेशनावर बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. खोके सरकारच्या निरोपाचे अधिवेशन सुरू होणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

एकनाथ शिंदे  काय म्हणाले?

निरोप द्यायला सभागृहात यावं लागणार की नाही. का फेसबुक लाईव्हवरून देणार आहात? निरोप द्यायचा की घ्यायचा आहे हे जनता ठरवत असते. आम्ही जनतेची सेवा केली असून आम्ही रस्त्यावरील आणि जमीनीसोबत जोडलेले कार्यकर्ते आहोत. जिथे जिथे आपत्ती येते तिथे आम्ही जातो, घरात नाही बसत. त्यामुळे लोकांना माहित आहे की काम करणार सरकार कोण आहे आणि फक्त खोटे आरोप करणार सरकार कोण आहे .शेवटच्या अधिवेशनात सर्वांनी भाग घ्यायला पाहिजे. राज्यातील जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यासाठी प्रत्येकाने आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडले पाहिजेत आणि त्याला न्याय मिळवून घेतला पाहिजे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

संविधान कधी बदलणा आहे का? आपलं संविधान हे जगात सर्वोत्तम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर संविधान कपाळाला लावलं आहे. बाळासाहेबांना काँग्रेसने दोनवेळा हरवलं, बाळासाहेब बोलायचे काँग्रेसचं जळकं घर आहे त्याच्यापासून दूर राहा. मोदींनी 2015 पासून संविधान दिन सुरू केला. मुंबईमधील इंदू मिल येथे जगाला हेवा वाटेल असं स्मारक उभारत आहोत. जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत संविधान कोणी बदलू शकत नाहीत, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

सर्वात जास्त पेपरफुटी  ठाकरे मुख्यमंंत्री असताना झाली- फडणवीस

सर्वात जास्त पेपरफुटी ही उद्धव ठाकरे मुख्यमंंत्री असताना झाली आहे. आता ते आम्हाला विचारत आहेत, जितक्या परीक्षा घेतल्या त्याचे रिपोटकार्ड आम्ही अधिवेशनात दाखवू. परकीय गुंतवणुकीत आमच्या काळात राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. विरोधकांनी प्रकल्पांवरून खोटा नरेटिव्ह सेट केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.