बोलताना … बाळगावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अजित पवार यांच्यावर टीका

अजित पवार यांच्यासारख्या व्यक्तीनं असं बोलणं योग्य नाही, असं मला वाटतं. अशाप्रकारचं वक्तव्य हे निंदाजनक आहे.

बोलताना ... बाळगावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अजित पवार यांच्यावर टीका
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Jan 01, 2023 | 8:21 PM

मुंबई : संभाजी महाराज यांच्यावरील वक्तव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली. अजित पवार यांचं वक्तव्य निंदाजनक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. बोलताना तारतम्य बाळगावं, असा सल्लादेखील शिंदे यांनी अजित पवार यांना दिला. तर, जेम्स लेनचं समर्थन करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे यांना प्रत्युत्तर दिलंय. शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेलं साम्राज्य संभाजी महाराज यांनी पुढं वाढविलं, जितेंद्र आव्हाड यांनी टीकाकारांना हे जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बोलताना सर्वांनी माहिती घेऊन बोललं पाहिजे. काही तारतम्य बाळगूण बोललं पाहिजे. एवढीच माझी इच्छा आहे. संभाजी महाराज यांनी देशासाठी, स्वराज्यसाठी आणि धर्मासाठी त्याग केलाय. धर्मवीर ही पदवी संभाजी महाराज यांनी आम्ही तुम्ही दिलेली नाही. धर्मासाठी दिलेल्या त्यागाबद्दल त्यांनी धर्मवीर म्हणतात. अजित पवार यांच्यासारख्या व्यक्तीनं असं बोलणं योग्य नाही, असं मला वाटतं. अशाप्रकारचं वक्तव्य हे निंदाजनक आहे.

शिंदे यांच्या या प्रतिक्रियेवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युतर दिलंय. जितेंद्र आव्हाड म्हणाले, शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या सीमांचं रक्षण करण्याचं काम संभाजी महाराज यांनी केलं. ते धर्मरक्षकही होते, त्यामध्ये एवढा बाऊ करण्याची गरज नाही. ज्यांनी जेम्स लेनला पाठिंबा दिला. शिवाजी महाराज यांच्या पितृत्वाबद्दल शंका व्यक्त केली. त्यांनी आम्हाला शिकवू नये.

जेम्स लेननं शिवाजी महाराजांबद्दल लिखाण केलं आहे. त्याचं समर्थन कोण करत होते, तुम्हाला माहिती आहे, असंही आव्हाड यांनी सांगितलं. जेम्स लेनला पाठिंबा देणाऱ्या लोकांच्या काय नादाला लागायचं.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.