तुम्ही तर बापच विकण्याचा प्रयत्न केलाय; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर पहिल्यांदाच थेट हल्ला
तीन महिन्यात गद्दार आणि खोके या शब्दांशिवाय तिसरा शब्दच तुम्हाल भेटला नाही. होय गद्दारी झाली, पण 2019 ला गद्दारी झाली असल्याचे सांगत काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका केली.
मुंबई: महाराष्ट्रातील जनतेसाठी आजचा दसरा (dussehra rally) सण सगळ्यांसाठी दसरा मेळावा ठरला आहे. एकीकडे शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळाव्यानी आरोप-प्रत्यारोपांनी गाजला आहे. उद्धव ठाकरेंना जोरदार घणाघात करत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बंडखोर आमदारांना होय तुम्ही गद्दारच म्हणत टीका केली तर त्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही दसरा मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाल की, तुम्ही तर बापच विकण्याचा प्रयत्न केला आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला केला.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना बंडखोर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला गद्दार आणि पन्नास खोके यावरुन केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत त्यांनी शिवसेना कुणाच्याही दावणीला बांधता येणार नाही असं ठामपणे सांगितले.
तीन महिन्यात गद्दार आणि खोके या शब्दांशिवाय तिसरा शब्दच तुम्हाल भेटला नाही. होय गद्दारी झाली, पण 2019 ला गद्दारी झाली असल्याचे सांगत काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका केली.
गद्दारी झाली मात्र ती गद्दारी निवडणुकीनंतर झाली असल्याचे सांगत बाळासाहेबांच्या विचाराशी तुम्ही गद्दारी केली. हिंदुत्वाशी गद्दारी केली, जनतेशी बेईमानी केली म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
आम्ही गद्दारी केली नाही, तर हा गदर असल्याचे सांगत गदर म्हणजे क्रांती असं म्हणत आपल्या बंडखोरीला त्यांनी क्रांती म्हटले आहे.
गदर म्हणजे उठाव आम्ही बाळासाहेबांचे शिलेदार आहोत आणि ज्यावेळी महाविकास आघाडी आम्हाला पटली नाही त्यावेळी आम्ही उठाव केला असंही त्यांनी यावेळी सांगितले.