मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही अक्षरशः ठाकरेंवर तुटून पडले; कारण होतं…
ज्यांनी रस्त्यांच्या कामाच्या नावाखाली काळंपांढरं करण्याचं ज्यांनी काम केले आहे. त्यांची आता ती दुकानं बंद होणार आहेत म्हणून त्यांच्या पोटाता भीतीचा गोळा आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर होते. मेट्रो आणि विकास कामांची उद्घाटनप्रसंगी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार बॅटिंग करत उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडले. 2019 ची निवडणुकीची आठवण सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर कशी बेईमानी केली, त्याचे उदाहरण दिले.
तर दाओस दौऱ्यामध्ये परदेशात मोदी भक्त कसे भेटले आणि हम उनकेही लोग है असं सांगत आपणही नरेंद्र मोदी यांचीच माणसं कशी आहोत हे सांगत त्यांनी मुंबईतील रस्त्याच्या टीकेवरून त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
मुंबई दौऱ्यावर पंतप्रधान असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांच्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण नरेंद्र मोदी यांची माणसं कशी आहोत हे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या गोटात भीती कशी पसरली आहे तेही सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचे उदाहरण देत त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
ज्यांनी रस्त्यांच्या कामाच्या नावाखाली काळंपांढरं करण्याचं ज्यांनी काम केले आहे. त्यांची आता ती दुकानं बंद होणार आहेत म्हणून त्यांच्या पोटाता भीतीचा गोळा आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात नवीन आलेले सरकार सहा महिन्यात एवढे काम करू शकते तर पुढील सहा महिन्यात आणि किती काम करेल याचा विचार विरोधक करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून टीका केली जात आहे असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.
तर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविषयी बोलताना सांगितले की, मुंबई महानगरपालिकेत ज्यांनी वीस वीस वर्षे ज्यांनी राज्य केले त्यांनी फक्त आपली फिक्स डिपॉजिट केली आहेत. त्यामुळे इतक्या वर्षातही त्यांनी कधी मुंबईकरांना पिण्याचे पाणी दिले नाही असा टोला त्यांनी ठाकरे यांच्यावर केला आहे.