अजित पवारांना या वक्तव्याबद्दल माफी मागायला पाहिजे; मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं…
धर्मवीर संभाजी महाराजयांबद्दलचे प्रेम त्यांच्या वृत्तीतून दिसून येते. नाव न घेता अजित पवार यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे.
मुंबईः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्या वादात आता मुख्यमंत्र्यांनी उडी घेत अजित पवार यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असंही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. अजित पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मत व्यक्त करताना म्हटले आहे की, धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबद्दल विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी संभाजी महाराज धर्मवीर नव्हते मात्र त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असं त्यांनी स्पष्टच सांगितले.
छत्रपती संभाजी महाराज यांचे औरंगजेबाने हाल केले होते. धर्मवीर ही पदवी तुम्ही आम्ही दिलेली नाही तर त्यांनी धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी मोठे काम केले होते.
आणि त्यांनी बलिदान दिल्यामुळेच त्यांना धर्मवीर ही पदवी देण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागायला पाहिजे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
वारंवार इतिहास पुसण्याचा आणि बदलण्याचा काम करण्यात येते आहे त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो असंही त्यांनी यावेळी सांगितले.
औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रास दिला होता. त्याचबरोबर महाराष्ट्रातील माता, भागिनीनादेखील त्रास दिला होता. मात्र औरंगजेबाबद्दल एवढा पुळका कसा असा सवालही त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाला त्यांनी केला आहे.
धर्मवीर संभाजी महाराजयांबद्दलचे प्रेम त्यांच्या वृत्तीतून दिसून येते. नाव न घेता अजित पवार यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे.