Eknath Shinde : दिंडीत वाहन घुसून जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री शिंदे, व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद

रुग्णालयात एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी वारकऱ्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी या वारकऱ्यांना संवाद साधता आला.

Eknath Shinde : दिंडीत वाहन घुसून जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री शिंदे, व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद
जखमी वारकऱ्यांची विचारपूस करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 3:28 PM

मुंबई : दिंडीत वाहन घुसून जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) धावून आले आहेत. जखमी झालेल्या वारकऱ्यांशी एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आहे. सांगली जिल्ह्यातील विटा येथील आमदार अनिल बाबर (Anil Babar) यावेळी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील केरेवाडी फाट्याजवळ पंढरपूरला एकादशीसाठी पायी चालत चालत असलेल्या वारकरी दिंडीमध्ये समोरून अचानक चार चाकी पिकअप गाडी घुसली. चारचाकी पिकअप गाडी घुसल्याने झालेल्या या अपघातामध्ये अंदाजे 12 वारकरी गंभीर जखमी (Seriously injured) असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या वारकऱ्यांची शिंदे यांनी विचारपूस केली. तसेच त्यांना दिलासा दिला. सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन यावेळी एकनाथ शिंदे यांनी जखमी वारकऱ्यांना दिले.

‘ट्रीटमेंट चांगली व्हायला हवी’

या अपघातानंतर कवठेमहांकाळ शासकीय रुग्णालयातून गंभीर जखमी वारकऱ्यांना उपचारासाठी 108 रुग्णवाहिकांमधून मिरज शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या जखमी वारकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. कशी तब्येत आहे. डॉक्टरांशी माझे बोलणे झाले. सर्वांनी काळजी घ्यावी. कोणतीही मदत असल्यास त्वरीत कळवावे. ट्रीटमेंट चांगली व्हायला हवी, असे वारकऱ्यांशी बोलताना त्यांनी दिलासा दिला.

हे सुद्धा वाचा

वारकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे

जखमींना मदतीची घोषणा

पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत ब्रेक फेल झालेले चारचाकी वाहन घुसले. त्यामुळे वयोवृद्ध वारकरी गंभीर जखमी झाले. सध्या मिरजमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी रुग्णालयात एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी वारकऱ्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी या वारकऱ्यांना संवाद साधता आला. एकूण 17 जखमी वारकऱ्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. आषाढी एकादशी आता जवळ येवून ठेपली आहे. रविवारी हा सोहळा साजरा होणार आहे. मात्र त्यापूर्वीच अपघाताची घटना घडल्याने आपल्या लाडक्या विठूरायाचे दर्शन आषाढी एकादशीच्या दिवशी या वारकऱ्यांना घेता येणार नाही. त्यांची प्रकृती ठीक झाल्यानंतरच ते पंढरीला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतील.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.