बेळगाव मुद्यावरुन संजय राऊत यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागितला हा पुरावा, म्हणाले तो तर वादग्रस्त इलाका

Sanjay Raut On CM | बेळगाव मुद्यावरुन खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. मुख्यमंत्र्यांनी बेळगाव प्रश्नावर आंदोलनात सहभाग घेतल्याच्या मुद्यावर त्यांनी कोपरखळी मारली. ते बेळगावच्या तुरुंगात असतील तर त्यांनी पुरावा सादर करावा, असे आवाहन त्यांनी केले. काय म्हणाले खासदार राऊत...

बेळगाव मुद्यावरुन संजय राऊत यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागितला हा पुरावा, म्हणाले तो तर वादग्रस्त इलाका
Follow us
| Updated on: Jan 18, 2024 | 11:22 AM

मुंबई | 18 जानेवारी 2024 : राज्याच्या राजकारणात पुन्हा बेळगावी सूर आलापण्यात आला आहे. राज्याच्या स्थापनेपासूनच बेळगाव हा मराठी अस्मितेचा विषय राहिला आहे. बेळगाव भागातील मराठी भाषिकांवर कन्नडिंगाकडून करण्यात येणाऱ्या अत्याचाराविरोधात अनेकदा आंदोलने झाली. आता नेमका हाच धागा पकडून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज्याचे जे सध्याचे मुख्यमंत्री आहे ते दावा करत आहे की मी बेळगावच्या जेल मध्ये होतो बोलत होते .बेळगाव तुरुंगात असेल तर अजूनही तसा पुरावा आला नाही .जर ते जेल मध्ये होते. लाठी काठी खाल्ली असेल, तर त्यांनी या प्रश्नावर तोंड उघडायला पाहिजे होते, अशी कोपरखळी राऊत यांनी मारली.

बेळगाव हा वादग्रस्त इलाका

बेळगाव हा वादग्रस्त इलाका आहे तो ना कर्नाटकचा आहे ना महाराष्ट्राचा आहे अशी ती स्थिती आहे, असे संजय राऊत म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्याची आग्रही भूमिका अनेकदा घेतली. आता शिवसेनेत असलेले आणि नसलेल्या अनेकांना गनिमी कावा करत बेळगावमध्ये आंदोलन पेटते ठेवले. मराठी अस्मिता जागृत ठेवली. आता पक्ष फुटल्यानंतर बेळगाव प्रश्नावर एकमेकांवर निशाणा साधण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

हा तर सेनेच्या बदनामीचा डाव

सत्ताधारी उद्धव ठाकरे गटावर खिचडी घोटाळ्याचा आरोप करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या खिचडी घोटाळ्याची यादीच जाहीर करत आरोपांची राळ उडवली होती. राऊत यांनी हे आरोप पुन्हा एकदा फेटाळले आहेत. “मुंबई महानगरपालिकेने कोरोना काळात उत्तम काम केलं. या संपूर्ण काळामध्ये शिवसेनेचे किंवा इतर सामाजिक संस्थांच्या लोकांनी कोविड सेंटर चालवली त्या काळामध्ये गोरगरिबांना स्थलांतर कामगारांसाठी खिचडी वाटप झाले तरीही अनेक खोटे प्रकरण खोटे साक्षी पुरावे उभे करून हे प्रकरणे निर्माण करून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे”, असे ते म्हणाले.

घोटाळ्यातील आरोपी भाजपमध्ये

138 लोकांना खिचडी वाटप काम देण्यात आलं. मात्र यात किती लोकांच्या चौकशी झाल्या किती लोकांवर ते गुन्हे झाले हे देखील समोर आणावे, असे आवाहन त्यांनी केले. किमान 38 अशा कंपन्या आहेत त्यांनी खिचडीचा वाटप केला नाही पण मुंबई महानगरपालिका करून कोट्यावधी रुपयाचे उकळले. पण हे सगळे त्यांचे मोरके हे शिंदे गटांमध्ये आहेत. बीजेपी मध्ये आहेत किंवा बीजेपी यांच्या संबंधित संस्था आणि एनजीओ आहेत, असा आरोप त्यांनी केला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.