आई रुग्णालयात, डॉक्टरांचा फोन आला; तरीही सभा पूर्ण करून आईचे अंतीम दर्शन घेतले, एकनाथ शिंदे यांनी सांगितला तो प्रसंग

हा एकनाथ शिंदे आज शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झाला. यामागे कष्ट, मेहनत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, आनंद दिघे साहेबांची शिकवण आणि तुमच्या सगळ्यांची साथ सोबत आहे.

आई रुग्णालयात, डॉक्टरांचा फोन आला; तरीही सभा पूर्ण करून आईचे अंतीम दर्शन घेतले, एकनाथ शिंदे यांनी सांगितला तो प्रसंग
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 9:09 PM

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेसाठी जीवाला जीव दिला. कष्ट केले. प्रसंगी स्वतः जीव धोक्यात घातला. घरादाराची पर्वा केली नाही. कितीतरी खून झाले. या शिवसेनेसाठी कितीतरी लोकं जेलमध्ये गेले. तेव्हा तुम्ही कुठे होता. किती केस झाल्या तुमच्यावर. असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. हा एकनाथ शिंदे आज शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झाला. यामागे कष्ट, मेहनत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, आनंद दिघे साहेबांची शिकवण आणि तुमच्या सगळ्यांची साथ सोबत आहे.

मुलाला हॉस्पिटल करून देऊ शकलो नाही

मला आठवते. श्रीकांत डॉक्टर झाला. एमएस झाला. तो म्हणाला, मला हॉस्पिटल करून द्या. पण, त्याचा बाप त्याला हॉस्पिटल करून देऊ शकला नाही. कारण कुठलीतरी निवडणूक यायची. ते राहून जायचं. एकनाथ शिंदेने कर्ज काढून निवडणुका लढवल्या. निवडून आल्यानंतर मातोश्रीवर जायचो.

शिवसेनेसाठी मिळेल ते काम केले. वयाच्या २१ व्या वर्षे ४० दिवस बेळगावच्या जेलमध्ये गेलो. माझ्यासोबत असलेल्या नेत्यांनी तेच केले. म्हणून शिवसेना मोठी झाली. पुढे गेली.

हे सुद्धा वाचा

सभा संपवूनच आईचे अंतीम दर्शन घेतले

लोकसभेची निवडणूक होती. आई रुग्णालयात उपचार घेत होती. डॉक्टरचा फोन आला. माझ्या बाजूला लोकसभेची उमेदवार गावीत होते. आईचा जीव गेला. तरीही सभा पूर्ण करून आलो. आईचे अंतीम दर्शन घेतलं. अशा अनेक जीवनात प्रसंग आले. असं सांगताना एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी तरळले होते.

अडीच वर्षात जेवढ्या सह्या झाल्या नव्हत्या. तेवढ्या सह्या एका दिवसात केल्या. कारण अगोदरचे मुख्यमंत्री पेनच ठेवत नव्हते. माझ्याकडे दोन-दोन पेन आहेत. हा मुख्यमंत्री गाडीत सही करतो. रस्त्यावर सही करतो. मंत्रालयात सही करतो. ठाण्यात सही करतो.

मुख्यमंत्री साह्यता निधीतून ७५ कोटी वाटले

मुख्यमंत्री साह्यता निधीचे अडीच वर्षात दोन कोटी वाटले होते. या पठ्ठ्याने एका वर्षात ७५ कोटी वाटले. अरे त्याचा जीव वाचवा. एका मुलाचे दोन्ही पाय गेले होते. एक हात गेला होता. त्याला मदत मिळाली नव्हती. व्हीलचेअरवर त्याचा बाप घेऊन आला होता. पाच लाख लिहिले आणि धनादेश दिला. असे काही प्रसंग एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.