मुख्यमंत्री आहे की मक्ख मंत्री? का होतेय एकनाथ शिंदे यांच्यावर ‘ही’ टीका

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली आणि उद्धव ठाकरे यांनी पुढे नेलेली शिवसेना ही निष्ठावंताची शिवसेना आहे.

मुख्यमंत्री आहे की मक्ख मंत्री? का होतेय एकनाथ शिंदे यांच्यावर 'ही' टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 23, 2023 | 6:58 AM

मुंबई : शिवसेनेच्या ( SHIVSENA ) निर्मितीपासून राजकीयदृष्ट्या ज्या काही उलथापालथ झाल्या तरी शिवसेनेने घेतलेल्या रक्तदानाचा वसा याचे नाव जगभर झाले आहे. उद्धव ठाकरे ( UDDHAV THACKAREY ) यांचा २७ जुलै हा वाढदिवस त्यानिमित्त गोरेगाव ( GOREGAON ) येथे २५ हजार बाटल्या रक्तदान केले होते. त्याची नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. एका बाजूला रक्तदानाचा वसा घेऊन आमची माणसे उभी आहेत तर दुसरीकडे रक्तशोषित जी राजकीय परिस्थिती आहे. रक्त शोषणे, रक्त पिपासूपणा आणि त्यातून जे काही वाईट घडत आहे. महिलांवरील अत्याचार किंवा पीडित हा जो काही प्रकार सुरु आहे ते पाहून मन विदीर्ण होते. अशा वेळेला या सत्तापिपासूपेक्षा शिवसेना वेगळी अशी उजळून दिसते, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत ( ARVIND SAWANT ) यांनी केली.

स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या जन्मदिवस आहे. यानिमित्त उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. शिवसेना आणि रक्तदान शिबीर यांचे नाते अतूट आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस हा आमच्यासाठी ऊर्जा दिवस आहे. त्यांनी आम्हाला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण शिकवले. त्यातूनच शिवसेना उजळून निघाली. उद्धव ठाकरे यांनी जी सर्वसमावेशक भूमिका घेतली आहे. त्याचे प्रकाश आंबेडकर यांनी मनापासून स्वागत केले आहे. त्यामुळे युतीबाबत ज्या काही चर्चा होत असतील तर त्या उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात होत असेल. त्यामुळे युतीचाच निर्णय योग्य वेळी ते जाहीर करतील, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथे जाऊन ३० जकार कोटींचे करार केले. पण, त्या कंपन्या महाराष्ट्र्रातीलच आहेत. मग ते तेथे गेले कशाला? दावोसला जाऊन कसला करार केला? हा मुख्यमंत्री आहे की मक्ख मंत्री आहे तेच कळत नाही. निवडणूक आयोगासमोर जो काही निर्णय प्रलंबित आहे तेथे आमचाच विजय होईल. सर्व प्रक्रिया आम्ही कायदेशीररित्या पूर्ण केली आहे. शिवसेनेची घटना आहे. कुठे २० लाख सभासद आणि कुठे ४ लाख, प्रतिज्ञापत्र शून्य. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केली आणि उद्धव ठाकरे यांनी पुढे केलेली शिवसेना ही निष्ठावंताची शिवसेना आहे, असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.