मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी माहिती, म्हणाले…

CM Eknath Shinde on Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना सरकारवर जोरदार टीका होत असल्याची पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे यांनी अल्टिमेटमनंतर परत एकदा आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्याआधी शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी माहिती, म्हणाले...
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 5:01 PM

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चांगलाच पेटत चालला असल्याचं दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली अल्टिमेटमची तारीख जवळ येत आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेत वेळ वाढवून देण्यात यावा, अशी मागणी केली होती. मात्र जरांगे यांनी मराठा समाजाच्या संघटनांशी चर्चा करत अल्टिमेटमची तारीख बदणार नसल्याचं सांगितलं. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

मराठा आरक्षणसंदर्भातला अहवाल शिंदे समितीकडून सरकारला सादर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती शिंदे समितीच्या कामकाजाचा शेवटचा अहवाल आहे. मुख्यमंत्री शिंदे अहवाल सभागृहात मांडणार आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. यावेळी रा्ज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.

शिंदे समितीने सादर केलेल्या अहवालात नेमकं काय?

मराठा कुणबी नोंदी असलेला अहवाल सादर करण्यात आला आहे. आतापर्यंत मिळालेल्या कुणबी नोंदीबाबत माहिती दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्पातील हा अहवाल असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये सादर करणार आहेत. न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा अहवाल सरकारकडे दिला गेला आहे. आतपर्यंत मिळालेल्या कुणबी नोदींची अधिकृत माहिती एकनाथ शिंदे सभागृहामध्ये सांगणार आहेत.

छगन भुजबळांचा गंभीर आरोप

सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटत सुटले आहेत, असा आरोप भुजबळ यांनी केला आहे. मराठ्यांनी ओबीसीमधून आरक्षण देऊ नका. त्यांना वेगळं आरक्षण देऊन टाका असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाचं नेतृत्त्व करणाऱ्या मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना, तब्बल 55 लाख कुणबी नोंदी मिळाल्या असल्याचं सांगितलं होतं. आता मुख्यमंत्री एकनाथ सभागृहात अहवाल सादर करतील त्यावेळी अधिकृत आकडा समोर येणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.