Breaking News: मुंबईत आमदारांसाठी 300 घरं बांधणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा, सेना आमदाराच्या मागणीवर निर्णय
आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घर मिळावं (Home In Mumbai) अशी मागणी बुधवारी विधानसभेत शिवसेना आमदारांकडून करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आज मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.
मुंबई : आज विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी मोठी घोषणा केलीय. आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घर मिळावं (Home In Mumbai) अशी मागणी बुधवारी विधानसभेत शिवसेना आमदारांकडून करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आज मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. कारण आमदारांसाठी आता मुंबईत 300 घरं बांधणार असल्याची घोषणा (Homes For Mla) मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय. महाविकास आघाडीचं सरकार फक्त बोलणारं नाही तर करून दाखवणारं सरकार आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली आहे. मुंबईत अनेकजण येतात कष्ट करतात, मात्र सध्याकाळी पाठ टेकायला घर नसतं, हाच विचार करून मुंबईकरांसाठी काही मोठे निर्णय मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहेत.
भाजपने सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून पाहिलं
मुंबईचा एवढा गांभीर्याने विचार फक्त माझ्या सरकारने केला. आधीही मुंबईचा विचार केला. मात्र सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून केला गेला, असे म्हणत विरोधकांना टोले लगावले आहेत. मुंबईतल्या कष्टकरी लोकांसाठी आम्ही लढतोय याचा शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून मला अभिमान वाटतोय असेही मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रच्या ज्या जागा मुंबईत आहेत, याचाही पाठपुरावा करून हे पूर्ण करण्यात येईल असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. काही योजना जाहीर केल्या मात्र काही योजनांचा विचार केला नव्हता, धारावीचा विकास होऊ शकला नाही कारण जमीन हस्तांतरण बाकी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
विरोधकांना मुख्यमंत्र्यांची जोरदार टोलेबाजी
बीडीडी चाळी संदर्भात झिम्मा फुगडी चालू होत, पण प्रत्यक्षात कामाला आम्ही सुरूवात केली. निवडणुकीच्या वेळेला घोषणा केल्या होत्या त्या महाविकास आघाडीचं सरकार बोलणार नाही करून दाखवणार आहे. मुंबईचा एवढा गांभीर्यानं विचार माझ्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांएवढा कुणी केला नव्हता, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखले आहे. मुंबईत घर घेणं हे प्रत्येकासाठी एक स्वप्न असतं मात्र अनेकांना घरांची अव्वाच्या सव्वा दर पाहता सहज घर घेणं शक्य होत नाही. मात्र या योजांनी आमदारांबरोबरच सर्वसामान्य मुंबईकरांनाही काहीतही हातभार लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Video: आमदारांना घरं देणार! Uddhav Thackeray यांची घोषणा, पण घोषणेनंतर खळखळून का हसले ठाकरे?