मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यव्यापी कोव्हिड लसीकरणाचा आज शुभारंभ

राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यव्यापी कोव्हिड लसीकरणाचा आज शुभारंभ
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 7:26 AM

मुंबई : कोव्हिड-19 विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (16 जानेवारी) सकाळी 11.30 वाजता मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रामध्ये होणार आहे. (Chief Minister Uddhav Thackeray inaugurated statewide covid vaccination from Mumbai on Saturday)

तत्पुर्वी, देशव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सकाळी 10.30 वाजता विलेपार्लेतल्या डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

मुंबईत एकूण 9 केंद्रांवर 40 बूथवर लसीकरण होणार आहे. सुरवातीला दररोज सरासरी 4 हजार जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविड 19 आजारावरील ‘कोविशील्ड’ या लसीचे सुमारे 1 लाख 39 हजार 500 डोस उपलब्ध झाले आहेत. महानगरपालिकेकडे 1 लाख 30 हजार लसींची लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. या मोहिमेसाठी 7 हजार कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार तीन टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱया टप्प्यात क्षेत्रीय आघाडीवर काम करणारे स्वच्छता कर्मचारी व कामगार, पोलीस आदी. त्यानंतर तिसरऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील सर्व नागरिक तसेच 50 वर्षाखालील सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी) असणारे नागरिक यांना लसीकरण करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात मुंबईत 63 लसीकरण केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यांद्वारे दररोज सुमारे 50 हजार नागरिकांचे लसीकरण करता येणार आहे.

(Chief Minister Uddhav Thackeray inaugurated statewide covid vaccination from Mumbai on Saturday)

पुणे लसीकरण कार्यक्रम

– सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत लसीकरण – पुण्यात एकूण 08 लसीकरण केंद्र – प्रत्येक केंद्रावर 100 नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस – आत्तापर्यंत 55 हजार वैद्यकीय सेवकांची नोंदणी – यामध्ये 11 हजार ५०० सरकारी कर्मचारी – पुणे पालिकेला 48 हजार लसीचे डोस उपलब्ध – 10 टक्के वेस्टज वगळून 22 हजार लाभार्थ्यांना दोन डोसेसची व्यवस्था

हे ही वाचा

पुण्यात 8 लसीकरण केंद्र, प्रत्येक केंद्रावर 100 नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस, वाचा पुण्यातील लसीकरणाची वैशिष्ट्ये

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.