राज्यपालांना निरोप देऊन मुख्यमंत्री वळले, 103 वर्षीय स्वातंत्र्य सैनिकाला भेटून म्हणाले…
मुंबईतील शिवाजी पार्कात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshiyari) यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झालं.
मुंबई : देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा (Shivaji Park flag hoisting Republic Day) उत्साह आहे. मुंबईतील शिवाजी पार्कात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshiyari) यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झालं. यानंतर भगत सिंह कोश्यारी यांनी राज्याला उद्देशून भाषण केले. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सायबर पोलीस ठाणे उद्घाटन सोहळा झाला. (Chief Minister Uddhav Thackeray meets senior freedom fighters at Shivaji Park after flag hoisting Republic Day)
सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पाच विभागीय सायबर पोलीस ठाण्यांचे ॲानलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. याचबरोबर 94 पोलीस ठाण्यातील स्वागत कक्षांचे उद्घाटनदेखील केले.
या उद्घाटन सोहळ्याला गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगल प्रभात लोढा, अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,पोलीस आयुक्त परम बीर सिंग आदी मान्यवर यावेळी उपस्थित.
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकासाठी मुख्यमंत्री थांबले
शिवाजी पार्क येथे राष्ट्रध्वजवंदन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित 103 वर्षांचे स्वातंत्र्य सैनिक सत्यबोध सिंगीत यांना पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या जवळ गेले आणि त्यांनी विचारपूस केली. सत्यबोध यांच्यासमवेत त्यांचा मुलगा आणि सूनदेखील होते.
खुद्द मुख्यमंत्री आस्थेने चौकशी करताहेत म्हटल्यावर सत्यबोध सिंगीत यांनी आनंद व्यक्त करुन त्यांनी आशीर्वाद दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या.
मुख्य कार्यक्रम संपल्यावर राज्यपाल आणि इतर मान्यवर परत जाण्यासाठी प्रवेशद्वारावर उभे होते. त्यांना निरोप देऊन मुख्यमंत्री अचानक आतमध्ये वळले आणि स्वातंत्र्य सैनिक कक्षाकडे गेले. तिथे उपस्थित वयोवृद्ध अभ्यागतांची अधिक विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री आत वळले.
VIDEO : शिवाजी पार्कातील ध्वजारोहण सोहळा
संबंधित बातम्या
Mumbai | Azad Maidan Flag Hoisting | मुंबईतील आझाद मैदानावर शेतकरी महिलेच्या हस्ते ध्वजारोहण
Mumbai | BMC Flag Hoisting | महापौर किशोरी पेडणेकरांच्या हस्ते मुंबई महापालिकेत ध्वजारोहण
(Chief Minister Uddhav Thackeray meets senior freedom fighters at Shivaji Park after flag hoisting Republic Day)