चिंचपोकळीच्या चिंतामणीची 100 वर्षांची परंपरा खंडित, आगमन सोहळा रद्द, मूर्तीबाबतही महत्त्वाचा निर्णय

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. (Chinchpoklicha Chintamani Aagman Sohala Cancelled)

चिंचपोकळीच्या चिंतामणीची 100 वर्षांची परंपरा खंडित, आगमन सोहळा रद्द, मूर्तीबाबतही महत्त्वाचा निर्णय
Follow us
| Updated on: Jun 15, 2020 | 9:36 PM

मुंबई : गिरणगावातील 101 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याची कोरोनासदृश परिस्थिती आणि पोलिसांवरील जबाबदारी त्यांच्यावर गणेशोत्सवात अतिरिक्त ताण पडू नये म्हणून आगमन सोहळा रद्द करण्यात आला आहे. (Chinchpoklicha Chintamani 2020 Aagman Sohala Cancelled)

त्याशिवाय यंदा चिंतामणीच्या मंडपातच मूर्ती घडवण्यात येणार आहे. गणपती मूर्तीच्या उंचीबाबत शासन जे निर्देश देईल, त्यानुसार मूर्ती बनवण्यात येईल. चिंतामणीची मूर्ती जागेवर घडवण्याची तयारी चिंतामणीच्या मूर्तीकार रेश्मा विजय खातू यांनी दर्शविली आहे.

चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पाटपूजन सोहळाही रद्द करण्यात आला आहे. यंदा पाटपूजन सोहळा ठरावीक पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत ठराविक अंतर ठेवून होईल. ‌यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा होईल. भव्य सजावट आणि रोषणाईवर खर्च न करता जमा होणाऱ्या वर्गणीतून शासकीय हॉस्पिटलला वैद्यकीय उपकरणे तसंच गरजूंकरिता रूग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

‌प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचे पालन करूनच यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करता पोलीस प्रशासनावर कसल्याही प्रकारचा अतिरिक्त ताण पडणार नाही. याची मंडळाकडून दक्षता घेण्यात येईल अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश सिताराम नाईक यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात विभागीय वर्गणीदार यांच्या व्यतिरिक्त इतर भाविकांना मुखदर्शन घेता येणार नाही. या उत्सव कालावधीत विभागीय वर्गणीदार यांना नियोजनानुसार ठराविक वेळेत दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन सर्व चिंतामणी भक्तांसाठी ऑनलाईन उपलब्ध असेल. त्यामुळे उत्सव काळात इतर चिंतामणी भक्तांनी गर्दी न करण्याचे आवाहन मंडळाचे सचिव वासुदेव सावंत यांनी केले आहे. (Chinchpoklicha Chintamani 2020 Aagman Sohala Cancelled)

संबंधित बातम्या : 

PHOTO : शतक महोत्सवी चिंतामणीचा फर्स्ट लूक

23 फुटांऐवजी 3 फुटांची गणेशमूर्ती, ‘परळचा राजा गणेश मंडळा’चे चार स्तुत्य निर्णय

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.