Chitra Wagh : महाराष्ट्रातील जनतेला या वसुली गँगची…अनिल देशमुखांवर तिखट प्रतिक्रिया; चित्रा वाघ यांचे आता उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान काय

Chitra Wagh on Uddhav Thackeray : अनिल देशमुख यांच्याविरोधात भाजपने मोर्चा उघडला आहे. 29 जुलै रोजी चित्रा वाघ यांनी देशमुखांना ठोस पुरव्यानिशी उत्तर देणार असल्याचा इशारा दिला होता. सचिन वाझे यांच्या वक्तव्यानंतर अनिल देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटल्याचे त्या म्हणाल्या.

Chitra Wagh : महाराष्ट्रातील जनतेला या वसुली गँगची...अनिल देशमुखांवर तिखट प्रतिक्रिया; चित्रा वाघ यांचे आता उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान काय
चित्रा वाघ, उद्धव ठाकरे, अनिल देशमुख
Follow us
| Updated on: Aug 03, 2024 | 10:50 AM

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भाजपने मोर्चा उघडला आहे. अनिल देशमुख यांनी गेल्या आठवड्यात भाजपवर आरोप केले होते. त्याचवेळी भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी त्यांना सज्जड पुराव्यानिशी उत्तर देण्याचा इशारा दिला होता. तर आता मुंबई पोलीस दलातून बडतर्फ झालेला अधिकारी सचिन वाझे याने देशमुखांवर आरोपांचा मोठा बॉम्ब टाकला. ते पीएमार्फत पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. याविषयीची नार्को टेस्टसाठी पण तयारी दाखवली. त्यानंतर आता चित्रा वाघ यांनी दारुगोळ्यासह महाविकास आघाडीवर तोफ डागली.

आरोपांची सखोल चौकशीची मागणी

सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर असताना पैसे मागितले जात होते, असे सचिन वाझेने सांगून टाकले आहे. याचे पुरावे गृहखात्याकडे त्याने दिल्याचे आणि तशा आशयाचे पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे सांगितले आहे. आमची मागणी आहे की याची सखोल चौकशी केली जावी, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप

निलंबित असताना अनिल देशमुख यांनी पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी आणि ते पैसे शरद पवारांना देण्यासाठी दोन कोटी रुपये मागितले होते, असा गंभीर आरोप पण त्यांनी केला. हे प्रकरण जनता विसरलेली नाही, असे त्या म्हणाल्या.  समित कदम नावाच्या व्यक्तीला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे पाठवलं असं थेट नाव घेत अनिल देशमुख यांनी आरोपांची राळ उडवली होती.  देवेंद्र फडणवीसांचं आव्हान अप्रत्यक्षपणे स्वीकारून अनिल देशमुखांनी त्यांच्यावर एका मागून एक आरोपांची राळ उडवल्यानंतर आता भाजपने बॉम्बगोळे सुरु केले आहेत.

उद्धव ठाकरे यांना केले आव्हान

सचिन वाझेविषयी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भर सभागृहात त्याची पाठराखण केली होती. सचिन वाझे म्हणजे लादेन आहे का? असे बेजबाबदार वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते, हे देखील सर्वश्रुत आहे. आज पुण्यात उद्धव ठाकरे यावर बोलतील का? महाराष्ट्रातील जनतेला या वसुली गँगची अधिक माहिती देतील का…? याची आम्ही वाट पहातोय, असा टोला त्यांनी लगावला.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.