“…यांची डोकी फिरलेली आहेत”; चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्याचा घणाघात

भाजप आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांना सत्तेचा माज आला असल्यामुळेच महापुरुषांबद्दल अशी वक्तव्य केली जात आहेत अशी टीका भाजपवर केली जात आहे.

...यांची डोकी फिरलेली आहेत; चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्याचा घणाघात
Follow us
| Updated on: Jan 29, 2023 | 9:53 PM

मुंबईः भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी चंद्रकांतदादांसारख्या ज्योतिबाचा शोध जारी आहे असं वक्तव्य केल्यानंतर आता राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे. चित्रा वाघ यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत जोरदार टीका केली आहे.

चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल वक्तव्य केल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी जोरदा हल्लाबोल चढविला आहे. यांची डोकी फिरली आहेत, सत्तेचा माज असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षातील लोकप्रतिनिधींकडून महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केली जात आहे.

त्याप्रकरणी महाविकास आघाडीने याविरोधात आंदोलनही छेडले होते. त्यानंतर आता भाजपच्या चित्रा वाघ यांनी चंद्रकांतदादासारख्या लोकांना ज्योतिबाचा शोध जारी असं वक्तव्य त्यांनी केले होते.

त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रसच्या जितेंद्र आव्हाड आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनीही त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

भाजप आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांना सत्तेचा माज आला असल्यामुळेच महापुरुषांबद्दल अशी वक्तव्य केली जात आहेत अशी टीका भाजपवर केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्यावर टीका होत असली तरी अजून तरी चित्रा वाघ यांनी त्यांच्या या वक्तव्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दलच्या त्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल केलेल्या या वक्तव्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस अधिकच आक्रमक झाली असून यावरून राजकीय वातावरण आणखी चिघळणार असल्याची चिन्हं दिसून येत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.