Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोर्टात जोरदार घमासान, न्यायाधीशांच्या समोरच वकिलांमध्ये शाब्दिक वाद, हसन मुश्रीफ यांच्या सीएला दिलासा की…?

हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर कोर्टाकडून लवकरच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. पण त्यांच्या कथित सीएच्या जामीन अर्जावर आज कोर्टात युक्तिवाद पार पडला. यावेळी दोन्ही पक्षाच्या वकिलांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोर्टात जोरदार घमासान, न्यायाधीशांच्या समोरच वकिलांमध्ये शाब्दिक वाद, हसन मुश्रीफ यांच्या सीएला दिलासा की...?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 4:58 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे कथित सीए महेश गुरव (Mahesh Gurav) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज कोर्टात सुनावणी पूर्ण झाली. मुंबई सेशन्स कोर्टाच्या विशेष पीएमएलए कोर्टात याबाबतची सुनावणी पार पडली. विशेष म्हणजे अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी होत असताना युक्तिवादादरम्यान जोरदार घमासान बघायला मिळालं. ईडीच्या वकिलांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर गुरव यांच्या वकिलांनी जोरदार हरकत घेतली. त्यामुळे काही मुद्द्यांवरुन दोन्ही पक्षाच्या वकिलांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद झाला. न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी दोन्ही वकिलांचा युक्तिवाद पूर्णपणे ऐकून घेतला. त्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला.

दरम्यान, हसन मुश्रीफ यांची 3 मुलं, साजिद, आबीद आणि नाविद यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेणं निश्चित झालंय. येत्या 3 एप्रिलला या प्रकरणी सलग सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 3 एप्रिलला एकाच दिवसांत तिघांचे वकील आणि ईडीचे वकील युक्तिवाद करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तो पर्यंत तीनही मुलांना अंतरिम दिलासा कायम राहणार आहे. ईडी अधिकारी त्यांना अटक करु शकणार नाहीत.

हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या याचिकेवर 5 एप्रिलला सुनावणी

ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ हे सध्या ईडी कारवाईच्या ससेमिऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरी ईडी अधिकाऱ्यांनी दोन वेळा छापेमारी केली. या छापोमारीतून ईडी अधिकारी त्यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गेल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ईडी अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण मुश्रीफांनी सुरवातीला चौकशीला जाणं टाळलं होतं. त्याऐवजी त्यांनी कोर्टाची पायरी चढत अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी पावलं उचलली. याप्रकरणी कोर्टाने त्यांना काही दिवसांसाठी दिलासा दिला. त्यानंतर हसन मुश्रीफ ईडी चौकशीला सामोरं गेले.

हे सुद्धा वाचा

हसन मुश्रीफ यांची गेल्या तीन आठवड्यांमध्ये तब्बल तीन ते चार वेळा चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुश्रीफांनी स्वत: गेल्या आठवड्यात सात तासांच्या चौकशीनंतर आपण ईडी कार्यालयात चौथ्यांदा आल्याची माहिती दिली होती. याशिवाय आपण ईडी अधिकाऱ्यांना सहकार्य केले. ईडी अधिकाऱ्यांचा एकही प्रश्न आपण टाळला नसल्याची प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव घेतलीय. याच प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आलीय.

हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवर कोर्टात दोन दिवसांपूर्वी युक्तिवाद पार पडलेला. या प्रकरणी न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला. या प्रकरणी विशेष पीएएमएलए कोर्टात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्याने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं. पण कोर्टाने या प्रकरणाचा तातडीने निकाल जाहीर केला नाही. कोर्टाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला. तसेच येत्या 5 एप्रिलला याबाबतचा निकाल देणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. त्यामुळे मुश्रीफांना या प्रकरणी दिलासा मिळतो का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.