मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जोरदार खलबतं, महायुतीचा जागावाटपाचा तिढा आजच सुटणार?

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात 'वर्षा' बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीनंतर महायुतीची पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जोरदार खलबतं, महायुतीचा जागावाटपाचा तिढा आजच सुटणार?
महायुती
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 5:41 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सध्या प्रचंड खलबतं सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक सुरु आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या या तीनही प्रमुख नेत्यांची काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी 7 जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बारामती, शिरूर, रायगड, सातारा, धाराशिव, परभणी आणि गडचिरोली या सात जागांसाठी अजित पवार आग्रही आहेत. पण साताऱ्याची जागा भाजपला हवी आहे. कारण भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसेल यांना साताऱ्याच्या जागेवर निवडणूक लढायची इच्छा आहे. उदयनराजे यांची इच्छा पाहता अजित पवार यांनी त्यांना घड्याळच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे आता उदयनराजे काय निर्णय घेतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या वर्षा बंगल्यावर बैठक सुरु आहे. या बैठकीला अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे हे देखील उपस्थित आहेत. लोकसभेत सहकार्य करा, विधानसभेत आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू अशी चर्चा काल दिल्लीतील बैठकीत झाली. त्यानंतर आज वर्षावर महत्त्वाची बैठक पार पडत आहे. अजित पवार 7 जागांवर ठाम आहेत.

अजित पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु

दुसरीकडे अजित पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जागावाटपाच्या भाजपच्या फॉर्म्युल्यावर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. मूळ पक्ष सोडून भाजपसोबत आल्याने आमच्यावर अन्याय होऊ नये, ही भाजपची जबाबदारी आहे, याची जाणीव अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना करुन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आपल्या हक्काच्या जागांसाठी आग्रही आहेत. शिंदे यांना 16 जागा हव्या आहेत. त्यामुळे अंतिम तोडगा कसा निघणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

‘वर्षा’वरील बैठकीआधी ‘देवगिरी’वर खलबतं

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक सुरु होण्यापूर्वी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर आज महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात बैठक झाली. चौघांच्या उपस्थितीत काल महायुतीच्या बैठकीत झालेल्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.