मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारांना सोबत घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीसाठी ही मोठा धक्का मानला जात असून शरद पवार काय प्रतुक्रिया घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजित पवारांसारखा नेता सरकारमध्ये आल्याने शिंदे सरकारची ताकद आणखी वाढणार आहे. अजित पवार यांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आता तातडीने मंंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. हे सरकार आता आधी डबल इंजिन होतं ते आता ट्रिपल इंजिन झालं आहे त्यामुळे आमचं सरकार वेगाने धावणार आहे. अजित पवार यांनी विकासाला साथ दिली आहे त्यामुळे आता राज्याच्या विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा या शपथविधीला पाठिंबा नाही. जेवढे गेले त्यातील 80 टक्के आमदार माघारी परतार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता अजित पवार यांचं बंड शरद पवार परत फोडण्यात यशस्वी ठरतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे जे आमदार आज शपधविधी घेत आहेत तसेच सत्तेत सहभागी होत आहेत त्यांची ती वैयक्तिक भूमिका आहे. पक्षासोबत या घडामोडींचा काहीच संबंध नाही, असं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.