‘हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी…’; मिलिंद देवरांच्या प्रवेशावेळी CM शिंदेच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

CM Eknath Shinde on Milind Deora : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी बोलताना,हा ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

'हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी...'; मिलिंद देवरांच्या प्रवेशावेळी CM शिंदेच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
Milind Devra Eknath Shinde
Follow us
| Updated on: Jan 14, 2024 | 4:56 PM

गिरीष गायकवाड, मुंबई : काँग्रेस पक्षाचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रेवश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती ‘वर्षा’ बंगल्यावर हा पक्षप्रवेश पार पडला. मिलिंद देवरा यांच्या जाण्याने दक्षिण मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडल आहे.  गेली साडे पाच दशके म्हणजे जवळपास 56 वर्षांचा देवरा यांच्या घराचा काँग्रेससोबतचा प्रवास त्यांनी थांबवला आहे. देवरा यांच्या प्रवेशावेळी, हा ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी असं एकनाथ शिंदे म्हणाले. शिंदे यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

काही ऑपरेशन असे करायचे सुई पण टोचली नाही पाहिजे कुठे टाकाही लागला नाही पाहिजे. गेल्या 50 वर्षापासून काँग्रेस सोबत आपली नाळ जुडली होती. आपण खासदार आणि मंत्रीही होतात. पण असे काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात. डॉक्टर नसतानाही मी दीड वर्षापूर्वी ऑपरेशन केलं. आरोप प्रत्यारोप न करता आपलं काम करत राहायचं.  मी, सकाळी उठून रस्ते धुवण्याचे काम करतो त्यामुळे चहल सुद्धा त्यात असतात. एक, अभ्यासू सयंमी नेता आपल्या मुळे पहिला मिळाला आहे. हा ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मिलिंद देवरा यांचे शिवसेनेत मनापासून स्वागत करतो. ते सपत्नीक आलेत, वहिनींचे देखील स्वागत. कुठलाही निर्णय घेताना यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेची ताकद असते. आपण निर्णय घेताना ज्या भावना होत्या त्याचा दीड वर्षापूर्वी माझ्या मनात होत्या. मी ज्या वेळेस हा निर्णय घेतला तेव्हा श्रीकांत शिंदे यांच्या आईला विश्वासात घेतल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

मिलिंद देवरा यांची काँग्रेस आणि ठाकरेंवर टीका

काँग्रेस पार्टीच्या सर्वात कठीण काळात मी सोबत होतो. 1968 ची काँग्रेस आणि 2004 च्या काँग्रेसमध्ये फरत आहे. मी 2004 मध्ये मी काँग्रेसमध्ये आलो. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे मेरीट आणि योग्यता यांना महत्व दिलं असतं तर मी आज येथे नसतो. एकनाथ शिंदे यांनाही वेगळा निर्णय घ्यावा असता, असं मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.

मी काँग्रेस सोडेल असं कधीच वाटलं नव्हते. माझ्या कुटुंबाचे काँग्रेससोबत असलेले 55 वर्षाचे जुने नाते संपवीत आहे. माझे राजकारण हे विकासाचे राजकारण राहिले आहे. माझी विचारधारा सामान्य लोकांची सेवा करणे हीच असल्याचं मिलिंद देवरा म्हणाले.

दरम्यान, माजी नगरसेवक सुनील नरसाळे, प्रमोद मांद्रेकर, माजी नगरसेवक रामबच्चन मुरारी, माजी नगरसेविका हंसा मारू, माजी नगरसेविका अनिता यादव, रमेश यादव, प्रकाश राऊत, मारवाडी संमेलन के अध्यक्ष अॅड. सुशील व्यास, पूनम कनौजिया, डायमंड मर्चंटचे संजय शाह, दिलीप साकेरिया, निवृत्त पोलीस अधिकारी हेमंत बावधनकर, वराय मोहम्मद, सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त राजाराम देशमुख, प्रशांत झवेरी, समर्थलाल मेहता, सौरव शेट्टी, अॅड. त्र्यंबक तिवारी, कांती मेहता, उदेश अग्रवाल, प्रवीण अग्रवाल इ. देवरा यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.