‘गिरे तो भी टांग उपर, घरी बसणाऱ्यांना लोक…’, मुख्यमंत्र्यांचा खोचक शब्दांत निशाणा

"समोरचा उमेदवार किर आहे. किर्रर्रर्रर्रर्र नावच ओळखत नाही. लोक कशाला किर किर बघतील? डावखरे नाव आले तर मैत्रीला जगणारा माणूस. वेगळे सबंध जपणारे. निरंजन पण तसाच आहे. मात्र त्याच्या हातात फोन देऊ नका. नाहीतर ईव्हीएम हॅक होतो. गंमतीने बोलतो", असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

'गिरे तो भी टांग उपर, घरी बसणाऱ्यांना लोक...', मुख्यमंत्र्यांचा खोचक शब्दांत निशाणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 16, 2024 | 9:20 PM

विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीचा ठाण्यात आज विजय संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता खोचक शब्दांत निशाणा साधला. “चंद्राबाबू नायडूंनी तुमचा पाठिंबा मागितला का? बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना. सरकार पडणार, मुख्यमंत्री बदलणार, असं म्हणतात. गिरे तो भी टांग उपर है. घरी बसणाऱ्यांना लोक निवडून देणार नाही”, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. “तरीही आपण बिलकुल गाफील राहू नका. 400 पार बाबत लोक रिलॅक्स झाले होते. मोदी सबको भारी पडले आहेत. तडीपार करणार, अशा घोषणा देणाऱ्यांनो, तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने तडीपार केले आहे. तुम्ही आम्हला काय तडीपार करणार?”, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

“निरंजन डावखरे सभागृहात 12 वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी अनेक मुद्द्यांवरुन आवाज उचलला आहे. रवींद्र चव्हाण सांगत होते, चांगलं बोलले. संजय मोरे यांचे 3 हजार मत बाद झाली होती. निरंजन यांचे साडेचार हजार बाद झाले होते. समोरचा उमेदवार किर आहे किर्रर्रर्रर्रर्र नावच ओळखत नाही. लोक कशाला किर किर बघतील? डावखरे नाव आले तर मैत्रीला जगणारा माणूस. वेगळे सबंध जपणारे. निरंजन पण तसाच आहे. मात्र त्याच्या हातात फोन देऊ नका. नाहीतर ईव्हीएम हॅक होतो. गंमतीने बोलतो”, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

“निरंजनने पोटतिडकीने 12 वर्ष काम केले आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडवले आहेत. या सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली. 2005 शिक्षक प्रश्न मार्गी लागणार. हे सरकार घेणारे नाही तर देणारे सरकार आहे. सरकारने महिलांसाठी अनेक प्रश्न सोडवले आहेत. निरंजन यांनी अनेक कामे केली आहेत. कामाचे कौतुम केले पाहिजे. मोदी यांनी तरुणांसाठी काम केले आहे”, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

‘निरंजन डावखरे यांच्या विजयावर आता शिक्कामोर्तब’

“विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित आहे. महायुतीमधील संजय मोरे यांनी माघारी घेतल्यामुळे निरंजन डावखरे यांच्या विजयावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा नरेटीव्ह यशस्वी झाला. त्यामुळे आता सर्वांच्या डोळ्यांत अंजन घालण्याची वेळ आलेली आहे. आपण थोडे गाफील राहिलो. संविधान बदलणार अशा अपप्रचारामुळे गोष्टी तळागळ्यात गेल्या”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“महाविकास आघाडी बरोबर काही एनजीओदेखील नरेटीव्ह सेट करत होते. काही एनजीओ चांगले आहेत. हे नक्षल गडचिरोली नाही तर एनजीओ अर्बन नक्षम घुसले आहेत. ते म्हणाले, मोदी हटाव. पण मोदी हटले नाहीत. आपण धार्मिक रंग दिला नाही. विकासाच्या मुद्यावर जोर दिला. आम्ही दोघे पहिले होतो. नंतर अजित दादा आले”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर निशाणा

“काँग्रेस नरेटीव्ह पोहोचवत आहे. हे एनजीओ विकासविरोधी आहेत. त्यांच्याकडे संस्कृती नाही. मी त्या ठिकाणी होतो. तुमच्या आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासासाठी महाराष्ट्राला भरभरून दिले. आपण उबाठा पेक्षा पुढे आहोत. फक्त काही प्रमाणात कमी पडलो. आता त्यांची भाषा बदलली. ते म्हणतात, 180 जागा जिंकणार. भाजपचे माजी खासदार कपिल पाटील यांचा भिवंडीत काही ठिकाणी थोडक्यात पिछाडीवर असल्यामुळे पराभव झाला. राहुल शेवाळे, यामिनी जाधव असेल असे अनेक लोक आहेत. काही ठिकाणी आघाडीवर होतो”, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

“उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील रवींद्र वायकर यांनी केलेला पराभव हा त्यांच्या जिव्हारी लागला. मतमोजणीच्या ठिकाणी रवींद्र वायकर यांचा मोबाईल नव्हता. तर अधिकाऱ्याचा मोबाईल होता”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.