मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना फोन, म्हणाले…
डॉ. हर्ष वर्धन यांनी दिल्लीत पत्रकारपरिषद घेत महाराष्ट्र सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात आपयशी ठरत असल्याची टीका केली होती. | CM Uddhav Thackeray Harshvardhan
मुंबई: राज्यातील गंभीर कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे राज्यातील ऑक्सिजन तुटवड्याबाबत चर्चा केली. त्यावर डॉ. हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्राला ऑक्सिजन कमी पडू दिला जाणार नाही, केंद्र सरकार त्यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन दिले. (CM Uddhav Thackeray calls health minister Harshvardhan)
काही दिवसांपूर्वी डॉ. हर्ष वर्धन यांनी दिल्लीत पत्रकारपरिषद घेत महाराष्ट्र सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात आपयशी ठरत असल्याची टीका केली होती. मात्र, आता मुख्यमंत्री आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेचे फलित सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे.
‘मोदी प्रचारात बिझी, उद्धव ठाकरेंना सांगितलं 2 मे नंतर फोन करा’
केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून वाढल्यांचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पीएमओ कार्यालयादरम्यान झालेला काल्पनिक संवाद मांडला आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पीएमओ कार्यालयालामधील फोन करतात. ते पीएमओ कार्यालयााला महाराष्ट्राला ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्यासंदर्भात नरेंद्र मोदी यांच्याशी बोलायचं असल्याचं सांगतात. तर पीएमओ कार्यालयाकडून पीएम सध्या डू नॉट डिस्टर्ब मोडवर असल्याचं उत्तर येतं. यावर उद्धव ठाकरे पंतप्रधान कधी उपलब्ध होतील, असं विचारतात. त्यानंतर पीएमओ कार्यालय ते 2 मे नंतर सर्व राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर उपलब्ध होतील, असं सांगते. सत्यजीत तांबे यांनी या उपरोधिक ट्विटद्वारे केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.
नवाब मलिक यांचा केंद्रावर गंभीर आरोप
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी आधी ट्विट करून आणि नंतर माध्यमांसमोर येऊन हा आरोप केला आहे. केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील 16 निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या 20 लाख रेमडेसिवीरचे इंजेक्शन विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्रसरकार त्यास नकार देत आहेत, असं मलिक यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या:
BMC ने रुग्णांचे चाचणी अहवाल लवकर द्यावेत, बेड मिळण्यात अडचण येऊ देऊ नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, केंद्राची कंपन्यांना धमकी; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप
(CM Uddhav Thackeray calls health minister Harshvardhan)