Cm Uddhav Thackeray : ईडी, सीबीआय मागे लावाल तर याद राखा.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपाला काय दिला इशारा?

एजन्सी जर तुम्ही आमच्या मागे लावणार असाल, आणि त्याच्यामागून शिखंडी म्हणून जर त्यांच्यामागून लढणार असाल तर महाराष्ट्र मेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. जर आमच्या मागे उगाचच लागाल, तर तुम्हाला दया माया क्षमा दाखवली जाणार नाही. असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.

Cm Uddhav Thackeray : ईडी, सीबीआय मागे लावाल तर याद राखा.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपाला काय दिला इशारा?
मविआचे सर्व आमदार हॉटेलात राहणार, मतदानाची रंगीत तालीम, सुत्रांची माहिती, मित्रपक्षांमुळे धाकधुक वाढली?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 10:25 PM

मुंबई : ईडी(ED), सीबीआय (CBI) मागे लावता आहात, खोट्या मार्गाने आमच्या मागे लागाल तर तुम्हाला सोडणार नाही, तसं केलं तर महाराष्ट्र जो पेटेल, तो पळता भुई करुन ठेवेल. असे सांगत गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईचा उद्धव ठाकरेंनी (Cm Uddhav Thackeray) समाचारा घेतला. या एजन्सी जर तुम्ही आमच्या मागे लावणार असाल, आणि त्याच्यामागून शिखंडी म्हणून जर त्यांच्यामागून लढणार असाल तर महाराष्ट्र मेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. जर आमच्या मागे उगाचच लागाल, तर तुम्हाला दया माया क्षमा दाखवली जाणार नाही. असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. कायद्याचा दुरुपयोग जसा आम्ही नाही करत, तसा तुम्ही करु नका, लढायचं असेल तर सरळ या. आम्ही आहोत, तुम्ही आहोत आणि ही जनता आहे. ही जनता ठरवेल राज्यावर राज्य कुणी करायचं, मुंबईवर राज्य कुमी करायचं. पण हे विकृत गलिच्छ राजकारण बंद करा. सुधरा कधीतरी सुधरा, असेही मुख्यमंत्री ण्ही

दंगली पेटवून काय मिळणार ?

घर पेटवून काय मिळणार तुम्हाला. घर पेटवणं सोप्प आहे. पणत्यातून मिळणार काय. आम्हाला घरातली चूल पेटवायची आहे. लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्यांच्या हातात दगडधोंडे देू नका असं आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केलं.

राज ठाकरे, ओवेसी, राणा यांचा भाजपाच्या टीम म्हणून उल्लेख

संभाजी नगरच्या नामांतराची गरज काय. आहेच ते संभाजीनगर. तिकडे तो ओवैसी गेला आणि औरंगजेबाच्या थडग्यावर डोकं टेकून आला. संजय तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे. यांचं जे काही चाललं.. याची ए टीम,बी टीम सी टीम… कुणाला तरी औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवायचं, कुणाच्या हाती भोंगा द्यायचा, कुणाच्या तरी हातात हनुमान चालिसा द्यायचा आणि मजा बघत बसायची. काय कारवाई झाली तर त्यांच्यावर होणार. आम्ही बोंबलायला मोकळे. आम्ही जाणार आणि टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. तसेच सुरक्षा किती झेड प्लस. कोण देतयं केंद्र सरकार. कुणाला तर या टिनपाटांना. तिकडे काश्मिरी पंडितांना सुरक्षा नाही. राहुल भट सांगत होता बदली करा. पण ऐकलं नाही. पण इथे भोकं पडलेल्या टीनपाटांना सुरक्षा देत आहेत केंद्राची. कुणाला वाय प्लस कुणाला झेडप्लस. बापाचा माल आहे तुमच्या? असा सवालही त्यांनी भाजपला केला आहे.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.