Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : भावनिक साद, त्याला भावनिक पत्रानं उत्तर, त्यावर एकनाथ शिंदे म्हणतात…ही आहे आमदारांची भावना…

आमदार संजय पत्रावर लगेच एकनाथ शिंदे यांनीही ट्विट करत ही भावना आमदारांची आहे, असे म्हणत एका ओळीत आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरचा अडचणींचा पाढा आता संपायचं नाव घेत नाहीये.

Eknath Shinde : भावनिक साद, त्याला भावनिक पत्रानं उत्तर, त्यावर एकनाथ शिंदे म्हणतात...ही आहे आमदारांची भावना...
भावनिक साद, त्याला भावनिक पत्रानं उत्तर, त्यावर एकनाथ शिंदे म्हणतात...ही आहे आमदारांची भावना...Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 1:29 PM

गुवाहाटी : राज्याचं राजकारण हे सध्या प्रचंड इमोशनल वळणावर पोहोचले आहे. कारण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी लाईव्ह येत शिवसैनिकांना भावनिक साद घातली. त्याचा परिणामही राज्यातील जनतेने अगदी काही मिनिटात पाहिला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा ते मातोश्री प्रवासातली गर्दी अनेक प्रश्नांची उत्तरं देणारी होती. मात्र यानंतर आता एका बंडखोर शिवसेना आमदाराने (Shivsena MLA in Assam) थेट उद्धव ठाकरे यांना एक भावनिक पत्र लिहिलंय. त्यानंतर अनेक राजकीय चर्चांणा उधाण आले आहेत. त्यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेना आमदारांची अडचण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या न भेटण्यावर आणि आजुबाजुच्या लोकांच्या वागण्यावरही त्यांनी बोट ठेवलं आहे. या आमदार संजय पत्रावर लगेच एकनाथ शिंदे यांनीही ट्विट करत ही भावना आमदारांची आहे, असे म्हणत एका ओळीत आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरचा अडचणींचा पाढा आता संपायचं नाव घेत नाहीये.

एकनाथ शिंदे यांचं आणखी एक ट्विट

शिवसेना आमदाराच्या पत्रात नेमकं काय?

या ट्विटवर आणि पत्रावर आता भरभरून प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. तसेच गेल्या अडीच वर्षातल्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कावरही अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय, असे म्हणत शिरसाट यांनी या पत्राची सुरूवात केली आहे. ते पुढे आपल्या पत्रात म्हणतात, काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती, असा थेट आरोप हा शिरसाठ यांनी केला आहे.

पराभवाचं खापरही आजुबाजुच्या लोकांवर फोडलं

तर हेच so called वडवे, आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यावर बोललेल्या शब्दांची आठवण करून देणारे हे शब्द या पत्रात वापरले आहेत, ते पुढे पत्रात म्हणतात, विधान परिषदेचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. असे म्हणत त्यांनी या पराभवाचं खापरही उद्धव ठाकरेंच्या आजुबाजुच्या लोकांवर फोडलं आहे. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश | मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही..असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरही बोट ठेवलं आहे. तर या काळात एकनाथ शिंदे यांनी आम्हाला साथ दिली म्हणत शिंदेंसोबत असण्याचे कारणही सांगितलं आहे.

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.