कोव्हिड योद्ध्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, उद्धव ठाकरेंचा ‘जय जवान, जय किसान, जय कामगार’चा नारा
खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाईल आणि सरकार म्हणून शेतकरी आणि कामगारांचं हित जोपासलं जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी विशेष आमंत्रित कोविड योद्धे, डॉक्टर, नर्सेस उपस्थित होते. “डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत” अशा भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. (CM Uddhav Thackeray hoists the National Flag at Mantralaya)
खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाईल आणि सरकार म्हणून शेतकरी आणि कामगारांचं हित जोपासलं जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले. यावेळी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि उच्च स्तरीय अधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी राज्यमंत्री दीपक केसरकरही उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार
- गावोगावी आणि दुर्गम भागापर्यंत चांगल्या आरोग्य सुविधा देणार
- कामगारांचे हित जोपासण्यास प्राधान्य
- जय जवान जय किसान, जय कामगार
- डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे.
- कोविडच्या परिस्थितीत पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक. पोलिसांच्या कामगिरीचा सार्थ अभिमान
- ऑनलाइन शिक्षण सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य.
- राज्यातील प्रमुख शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणार
- (CM Uddhav Thackeray hoists the National Flag at Mantralaya)
भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केले. यावेळी श्रीमती रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. pic.twitter.com/9U8zTYMzgN
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 15, 2020
संबंधित बातम्या :
कोरोना लस ते LAC वर सडेतोड उत्तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताच्या 100 बड्या संगीतकारांनी एकत्र येऊन गायले वंदे मातरम्
(CM Uddhav Thackeray hoists the National Flag at Mantralaya)