नवी मुंबई : नाशिकमधील ग्रेप पार्क, खारघरमधील एमटीडीसीच्या युथ हॉस्टेलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून युथ हॉस्टेल पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. (CM Uddhav Thackeray inaugurated MTDC’s Kharghar Youth Hostel)
पर्यटन विकास महामंडळाने खारघरमध्ये उभारलेल्या युथ होस्टेलचे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरुन ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे खारघरमधील युथ हॉस्टेलमध्ये उपस्थित होते. युथ हॉस्टेलचे रविवारी दुपारी 12.30 वाजता उद्घाटन झाल्यानंतर ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले.
A glimpse of MTDC’s Kharghar residency that we have launched today. pic.twitter.com/HD4DUNoY7c
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 27, 2020
अदिती तटकरे यांनी 4 सप्टेंबरला युथ हॉस्टेलची पाहणी केली होती. काही दिवसांतच खारघर युथ हॉस्टेल खुले केले जाईल, असे आश्वासन अदिती तटकरेंनी त्यावेळी दिले होते. राष्ट्रवादीचे पनवेल जिल्हा अध्यक्ष व नगरसेवक सतीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे नेते फारुक पटेल, खारघर शहर महिला अध्यक्षा राजश्री कदम हे नेते उपस्थित होते.
दरम्यान, नाशिकमध्ये एमटीडीसी ग्रेप पार्क आणि बोट क्लबचे उद्धाटनही यावेळी करण्यात आले. तत्कालीन पर्यटन मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून हे सत्यात उतरल्याचे यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले. (CM Uddhav Thackeray inaugurated MTDC’s Kharghar Youth Hostel)
This is the boat club in Nashik by @maha_tourism inaugurated today CM Uddhav Thackeray ji.
It was envisioned by the then Tourism Minister and now Nashik Guardian Minister @ChhaganCBhujbal ji. Glad to have launched it today https://t.co/d8vtaWAQ2o— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 27, 2020
संबंधित बातम्या :
एमटीडीसीचा अनोखा उपक्रम, पर्यटकांसमोर मोटोहोम कॅम्परवॅनचा नवा पर्याय
सिंधुदुर्गही म्हणणार ‘वाह ताज’! ताज हॉटेल्स ग्रुपसोबत ठाकरे सरकारचा करार
(CM Uddhav Thackeray inaugurated MTDC’s Kharghar Youth Hostel)