CM LIVE : घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील (CM Uddhav Thackeray LIVE) जनतेशी संवाद साधून कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचं म्हटलं.

CM LIVE : घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Mar 19, 2020 | 12:46 PM

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील (CM Uddhav Thackeray LIVE) यांनी राज्याला संबोधित करुन खबरदारीचं आवाहन केलं. घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. हे ‘वॉर अगेन्स व्हायरस’ आहे. आपण खबरदारी घेत आहात, पण आणखी खबरदारी घ्यायला हवं असं मुख्यमंत्री म्हणाले. (CM Uddhav Thackeray LIVE)

हा विषाणू हळूहळू पावलं पुढे टाकत आहे. आपण त्याला थोपवत आहोत. आपल्याकडचे रुग्ण सर्वजण बाहेरुन आलेले आहेत. अनवाश्यक असेल तर घरातून  अजिबात बाहेर पडू नका, बस, रेल्वेमधील गर्दी आणखी कमी करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

कोरोना हे एक युद्ध आहे. आपल्याकडे पुरेशा गोष्टी आहेत. आपण घाबरु नका, सरकार तुमच्यासोबत आहे. युद्धाचा आनुभव फार वाईट असतो. पण युद्धासाठी आम्ही सज्ज आहोत, पण यंत्रणेवरील भार कमी करणं ही आपली जबाबदारी आहे. यंत्रणा सांभाळणारी ही सुद्धा माणसंच आहेत. कळत न कळत त्यांच्या मनातही धोका आहेच, पण तो धोका पत्करुन ते 24 तास काम करत आहेत. सरकारकडून ज्या सूचना दिल्या  जात आहेत, त्या पाळा, अफवांवर विश्वास ठेवू नका, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

कोरोनासाठी आपली यंत्रणा सज्ज आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या साठा देखील आहे.घाबरुन जाऊ नका. हे व्हायरसविरुद्ध युद्ध आहे,तुम्ही सहकार्य करावे ही माझी अपेक्षा आहे! तुम्ही घर सोडू नका,बाहेर जाऊ नका.  डॉक्टर्स, नर्सेस हे त्यांचं घर सोडून तुमच्यासाठी काम करत आहेत.

अनावश्यक प्रवास तरीही होत आहे. आपल्याकडे केसेस वाढत आहे.काळजी घ्यावी लागणार आहे. बाहेरच्या देशातून जी लोक येत आहेत ते आपलेच आहेत. सगळ्यांनी सुरक्षित राहावे.दिलेल्या सूचना पाळा. हातावर quarantine स्टॅम्प मारलेले लोक इथे तिथे फिरत आहेत.आपली travel history लपवत आहेत.हे योग्य नाही.

मला कल्पना नाही किती लोकांना 19565 आणि 1971 चे युद्ध पाहिले.  युद्धाचा अनुभव हा फार वाईट असतो, युद्ध 71 साली झालं. पण युद्ध हे घाबरुन लढायचे नाही. त्याचा मुकाबला करायचा असतो.

युद्धाच्या काळात संध्याकाळचा सुमारास सायरन वाजायचा, सर्वांच्या घरातले दिवे बंद व्हायचे,  हे कोणाला आवडत नव्हते, शत्रूचे आपल्यावर हल्ला होऊ नये म्हणून ही काळजी घेतली होती. शत्रूची विमानं मुंबईत आली होती. ती विमानं आपल्या सैनिकांनी परतवली होती.

आताचं जे युद्ध आहे ते विषाणूसोबत आहेत. वॉर वर्सेस विषाणू आहे. या विषाणूसोबत डॉक्टर, नर्स, बस ड्रायव्हर, सर्व अधिकारी आपल्यासाठी लढत आहेत.  ही लोक आपल्यासाठी 24 तास लढत आहेत. जर ते आपल्यासाठी काम करत असतील तर आपण घरात राहू शकत नाही का? मी तुम्हाला आवाहन केले घरात राहा, मात्र सांगूनही अनावश्यक प्रवास होत आहे. शक्य असेल तर अजून प्रवास बंद करा. सर्व मंदिरं, दुकाने बंद केले आहेत. आपल्याकडे सुद्धा विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. सर्वच सर्व बाहेरुन रुग्ण आले आहेत.

बाहेरच्या अनेक भारतीय लोकांना देशात परतायचे आहे. सर्वांना एक विनंती करतो, ज्यांच्या ओळखीत आहेत त्यांना तुम्ही सांगा सुरक्षित राहा, घराच्यांना सुरक्षित ठेवा, तुम्ही स्वत: सुरक्षित राहा, त्यांच्या हातावर स्टॅम्प मारुनही ते फिरायला जात आहेत. लक्षणं लपवणे, प्रवास लपवणे, अशी कामं झाली नाही पाहिजे.

जे बाहेरुन येत आहेत त्यांच्यासाठी आपण आयसोलेशनची सुविधा केली आहे. पंतप्रधान सुद्धा आपल्यासोबत पूर्णपणे मदत करत आहेत. चाचणीची सुविधाही आपण वाढवली आहे. कुणीही घाबरुन जाऊ नका, हे युद्ध जिद्दीवर लढले जाते, जी यंत्रणा तुमच्यासाठी काम करत आहे, त्यांच्यावर तुम्ही भार आणू नका, जेवढा त्यांच्यावरचा भार आपण कमी करु, तेवढे त्यांना अधिक काम करता येईल.

ज्या सूचना सरकारकडून मिळत आहेत, त्या पाळा, सर्वधर्मियांना एक विनंती करतो, सर्वांनी एकजुटीने काम केले तर हे संकट आपले काही करु शकत नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, आपण हे युद्ध जिंकूच.  अनवाश्यक गोष्टी आहेत तिथे जाणे टाळा, ऑफिसमध्येही जाऊ नका, वर्क फ्रॉम होम करा.आपण सर्व मिळून या संकटावर मात करु.

ज्या सूचना सरकारने दिल्या आहेत त्या पाळा. सर्व धर्मियांना विनंती हे संकट जात पात धर्मा पलिकडे आहे. एकजुटीने लढूया. कृपा करा, गर्दी कमी करा, अनावश्यक प्रवास टाळा..वर्क फ्रॉम होम करा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

मोदी देशाला संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. गर्दी टाळण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच केलं आहे. जर लोकल ट्रेनमधील गर्दी कमी झाली नाही तर ट्रेन बंद करण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावं लागेल असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.  (CM Uddhav Thackeray LIVE)

मुख्यमंत्र्यांची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

“राज्यातील शासकीय कार्यालय एक दिवसाआड पद्धतीने (CM Uddhav thackeray On Corona) रोज 50 टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील. तसेच रेल्वे, एसटी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवाशी क्षमतेने चालवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.”

“मुंबईत बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येतील. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील. शहरांमध्ये बसेसची संख्या वाढवण्यासाठी बंद असलेल्या शाळेच्या बसेस वापरण्यात येतील.”

“शहरातील सर्व दुकाने अंतरा-अंतराने सकाळी आणि दुपारी सुरु होती. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये काही बदल करण्यात येईल.”

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.