मुंबई : चक्रीवादळाने नुकसान झाल्याने मदतीची याचना करणाऱ्या शिक्षिकेला, अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संपर्क साधला आहे. टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर याबाबतचं वृत्त प्रकाशित झाल्यानंतर, रणदिवे बाईंच्या (Suman Randive) विद्यार्थ्यांनी तातडीने दखल घेत, मदतीचं आश्वासन दिलं. तोत्के चक्रीवादळाने वसईतील वृद्धाश्रमाचं मोठं नुकसान झालं होतं. त्याबाबतचं वृत्त टीव्ही 9 ने दाखवलं. त्या वृत्ताची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली. (TV9 Impact CM Uddhav Thackeray office and MNS chief Raj Thackeray called up and spoke to ex teacher Suman Randive gave assurance to provide necessary help)
मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने सुमन रणदिवे या मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकेला संपर्क साधून आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यात येईल अशी हमी देण्यात आली. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडूनही रणदिवे बाईंशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्याकडूनही मदतीचं आश्वासन देण्यात आलं.
कोकणासह मुंबई उपनगरालाही तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या शिक्षिकेचंही मोठं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील या तिन्ही बड्या नेत्यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे (Suman Randive) या 90 वर्षांच्या आहेत. सुमन सध्या वृद्धाश्रमात आहेत. मात्र वसईतील या वृद्धाश्रमाला तोत्के वादळाचा फटका बसला. आता या वृद्धाश्रमाला मदत मिळावी, अशी मागणी या शिक्षिकेने आपले विद्यार्थी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
“या चक्रीवादळामुळे आमच्या वृद्धाश्रमाचं खूप नुकसान झालं. छप्पर उडालं. सगळ्या वृद्धांना रात्री झोपायला त्रास होतो. मच्छर चावतात. उद्धव बेटा मला तुला भेटायचं आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असातना मी तुला शिकवले होते. इथली परिस्थिती खूप खराब आहे. कृपया आम्हाला मदत कर”, असं शिक्षिका सुमन म्हणाल्या.
सुमन लक्ष्मीकांत रणदिवे या दादर इथल्या बालमोहन विद्यामंदिर या शाळेत शिक्षिका होत्या. तिथे त्या गणित आणि विज्ञान हे विषय शिकवत होत्या. त्या 1991 मध्ये निवृत्त झाल्या.
सुमन रणदिवे या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, जयंत पाटील यांच्या माजी शिक्षिका आहेत. 1991 मध्ये त्या निवृत्त झाल्या. मात्र पतीचं निधन आणि काही काळाने झालेला मुलाचा मृत्यू, यामुळे सुमन रणदिवे या वसईतील सत्पाळा गावातील “न्यू लाईफ फाऊंडेशन” या वृद्धाश्रमात आहेत.
सीएमओकडून संपर्क
That’s the power of social media, yesterday after showing our story, this video reached to our CM and other leaders. MNS chief Raj Thackeray called up and spoke to this old lady and CMO also contacted and gave assurance to provide necessary help ? @Iamrahulkanal @RajThackeray https://t.co/XIbs0taS3w
— Shivangi Thakur (@thakur_shivangi) May 27, 2021
संबंधित बातम्या
CM Uddhav Thackeray office and MNS chief Raj Thackeray called up to ex teacher Suman Randive gave assurance to provide necessary help