मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील भाविकांना कार्तिकी वारी गर्दी न करता (CM Uddhav Thackeray On Corona) साधेपणाने पार पाडण्याचं आवाहन केलं. मुख्यमंत्र्यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी आपल्या संवादात उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाचा वाढता आकडा आणि राज्य सरकारचे प्रयत्न याचीही माहिती दिली (CM Uddhav Thackeray On Corona).
कोरोनाची पुढील लाट ही लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे नागरिकांना गाफिल राहू नये आणि हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क लावणे या त्रिसूत्रीचं पालन करावं, असंही आवाहन केलं. यावेळी आपल्या संवादात उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाचा वाढता आकडा आणि राज्य सरकारचे प्रयत्न याचीही माहिती दिली.
कार्तिकी वारी साधेपणाने करा, गर्दी करु नका – मुख्यमंत्री
आपण सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं उघडली आहेत. चार दिवसांवर कार्तिकी वारी येत आहे. कार्तिकीची वारी साधेपणाने पार पाडा. गर्दी न करता सण-उत्सव साजरे करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
राजकारण करायचं नाही, सगळं सुरू करतो, जबाबदारी घेता का? – मुख्यमंत्री
कोरोनाच्या विषयावर मला कोणतंही राजकारण करायचं नाही. पण काही लोकांचं हे उघडा ते उघडा असं सुरु आहे. मी सर्व काही सुरु करायला तयार आहे. काही झालं तर त्याची जबाबदारी घेता का?, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले. राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढी जबाबादारी माझ्यावर आहे. तेवढी जबाबदारी हे उघडा ते उघडा म्हणणाऱ्यांवर नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं (CM Uddhav Thackeray On Corona).
शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, पण शाळा सुरू होईल की नाही प्रश्नांकित – मुख्यमंत्री
गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांना अखेर उद्यापासून उघडण्याची परवानगी सरकारने दिली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनीच याबाबत साशंकता दर्शवली आहो. “आपण शाळा उघडू शकलो नाही. निर्णय घेतला पण उघडू शकलो नाही, कारण प्रश्नांकित आहे. उद्या मुलं आजारी पडू नये याची काळजी आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
पोस्ट कोविडचे दुष्परिणाम, मेंदू आणि किडनीवर परिणाम – मुख्यमंत्री
“आता नवीन गोष्ट लक्षात येत आहे ते म्हणजे पोस्ट कोविड, कोविड होऊन गेल्यानंतरचे दुष्परिणाम. मेंदू, किडनी, पोट, फुफ्फुसे, श्वसन संस्थेवर परिणाम होतात आणि काही जणांना त्याचे नंतर दुष्परिणाम भोगावे लागतात. कशासाठी आपण ही विषाची परीक्षा घ्यायची? का आपण त्याकडे दुर्लक्ष करायचं?”, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना सतर्क केले.
राजकारण करायचं नाही, सगळं सुरू करतो, जबाबदारी घेता का?; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलेhttps://t.co/jJzXkRYDf4#UddhavThackeray #maharashtragovt #MaharashtraPolitics #CoronaVirusUpdates #mahavikasaghadi
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 22, 2020
CM Uddhav Thackeray On Corona
संबंधित बातम्या :
पोस्ट कोव्हिडचा नवीन प्रकार गंभीर, मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं अलर्ट
CM Uddhav Thackeray | कुठलीही गर्दी न करता कार्तिकी वारी साधेपणाने पार पाडा; मुख्यमंत्र्यांचं आवाहन