Extended Lockdown : वांद्र्यातील गर्दी ते आगीचे बंब, टास्क फोर्स ते तज्ज्ञ समिती, मुख्यमंत्र्यांचे 10 महत्त्वाचे मुद्दे

कोरोनानंतर आर्थिक संकटाच्या सामन्यासाठी समिती स्थापन, कोरोनानंतर आर्थिक संकट असेल, त्याविरुद्धची तयारी सुरु झाली आहे

Extended Lockdown : वांद्र्यातील गर्दी ते आगीचे बंब, टास्क फोर्स ते तज्ज्ञ समिती, मुख्यमंत्र्यांचे 10 महत्त्वाचे मुद्दे
Follow us
| Updated on: Apr 14, 2020 | 9:08 PM

मुंबई : कोरोनामुळे देशात 3 मेपर्यंत वाढलेला लॉकडाऊन आणि वांद्र्यात उसळलेल्या जीवघेण्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray On Extended Lockdown) आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परप्रांतीय नागरिकांना चिंता न करण्याचं आवाहन केलं. तसेच, अनेक मुद्यांवर माहितीही दिली. शिवाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने भीम सैनिकांनी पाळलेल्या शिस्तीबद्दल उद्धव ठाकरे यांनी भीम सैनिकांचे विशेष धन्यवाद मानले (Uddhav Thackeray On Extended Lockdown).

मुख्यमंत्र्यांच्या प्रसारणातील 10 महत्त्वाचे मुद्दे 

तुम्ही माझ्या महाराष्ट्रात सुरक्षित आहात, मजुरांना शब्द, गोरगरीब मजुरांच्या भावनांशी खेळू नका, त्याचं राजकारण करु नका, कुणीतरी गैरसमजाचं पिल्लू सोडल्यामुळे वांद्र्यातील गर्दी,  तुम्ही परराज्यातून आले आहात, पण तुम्हाला लॉक करुन ठेवण्यात आम्हाला आनंद नाही, मात्र काळजी करु नका, तुम्ही महाराष्ट्रात सुरक्षित आहात

– मी आधीही इशारा दिला आहे, जर या लोकांच्या भावनांशी खोळून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कुणी प्रयत्न केला तर कोणीही असला तरी तो महाराष्ट्र सरकारच्या कायद्यातून सुटणार नाही. हे संकट सर्वांवर आहे. या संकटाचा सामना आपल्या सर्वांना मिळून करायचा आहे. यामध्ये उगाच गैरसमजाची पिल्ल सोडून त्याला वेगवेगळे रंग देऊन आग भडकवण्याचं काम कोणी करु नये, आपल्याकडे आगीचे बंब भरपूर आहेत, या आगीला मी अजिबात पसरु देणार नाही

– पंतप्रधानांनी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवला, मी त्यांचे आभार मानतो, मी तीन दिवसांआधीच सांगितलं होतं, मी ती 30 एप्रिलपर्यंत वाढवली होती ती पीएमनी मेपर्यंत नेला

– कोरोनानंतर आर्थिक संकटाच्या सामन्यासाठी समिती स्थापन, कोरोनानंतर आर्थिक संकट असेल, त्याविरुद्धची तयारी सुरु झाली आहे, अजित पवारांच्या नेतृत्त्वात समिती केली आहे, डॉ रघुनाथ माशेलकर, विजय केळकर, दीपक पारेख यांसारख्या तज्ज्ञांची एक समिती केली आहे (Uddhav Thackeray On Extended Lockdown), कोरोनाविरोधात टास्क फोर्स तयार केली, डॉ. संजय ओक यांच्यासह विविध तज्ज्ञ डॉक्टर या फोर्समध्ये आहे, आरोग्य सेवेला हे डॉक्टर्स मार्गदर्शन करतील

– प्लाज्मा ट्रिटमेंट आणि एक बीसीजी लस याबाबत प्रयोग करण्याची परवानगी केंद्राकडे मागणी केली आहे, परवानगी मिळाल्यानंतर मला खात्री आहे की उद्या महाराष्ट्र जगाला दिशा दाखवेल, असा मला आत्मविश्वास आहे, इतकी हिम्मत कसब आणि बुद्धीमत्ता महाराष्ट्रात आहे

– ही वेळ राजकारणाची नाही, त्यासाठी संपूर्ण आयुष्य, सध्याची वेळ धीराना, धैर्याने आणि एकजुटीने ऋण परतवण्याचं आहे, ते जर केलं नाही तर आपल्याला कुठल्याही दुसऱ्या शत्रूची गजर नाही

– अर्धा एप्रिल संपला आहे, एक दीड महिन्याने पाऊस सुरु होईल, त्यामुळे राज्यातील आदीवासी आणि अतिशय दुर्गम विभाग जे आहेत जिथे पावसाळ्यात त्रास होतो, तिथे त्यांना जीवनावश्यक सुविधांचा पुरवठा करावा लागतो, या भागात सोयी सुविधा पोहोचवण्याचं काम सुरु करण्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश, कोरोनामुळे त्यांना त्रास होता कामा नये

– वैद्यकीय क्षेत्रातील निवृत्त परिचारीका, वॉर्डबॉईज, डॉक्टॉर्स, जवान ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम केलं आहे आणि ज्यांनी वैद्यकीय शिक्षणाचा कोर्स पूर्ण केला आहे, अशा सर्वांना ‘कोविड योद्धा’च्या माध्यमातून आवाहन केलं होतं. ज्यांची तयारी आहे त्यांनी या वेबसाईटवर संपर्क करण्याचे आवाहन केलं होतं, मला अभिमानआहे आतापर्यंत 21 हजार जणांनी यावर आपली तयारी दर्शवली आहे, त्याबाबतची कामं सुरु आहेत

– धान्याचा पुरवठा सगळीकडे करतो आहे, रेशनिंगच्या माध्यमातून जवळपास सव्वा कोटी कुटुंबांनी त्यांचं धान्य नेलं आहे. अन्न सुरक्षा योजनेतील तांदूळ आला आहे, त्याचं वाटपही सुरु झालं आहे. त्याचबरोबर आपण डाळीचीही मागणी केली आहे

– आपला कृषीप्रधान देश आहे. बळीराजा आपला आत्मा आहे. या अन्नदात्याला आपण अडवलेलं नाही. आता त्याचं खरीबाचं हंगाम येत आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत शेतीविषयक वस्तूंच्या खरेदीची दुकाने कायम चाली राहणार आहेत. जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा तसाच चालू राहिल. 20 तारखेनंतर कोणते उद्योगधंदे सुरु करता येतील त्याचा अंदाज घेतला जात आहे. परंतु, कुणीही घाबरुन जाऊ नका.

Uddhav Thackeray On Extended Lockdown

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.