Nisarga Cyclone | निसर्ग परीक्षा घेतोय, ताकदीने सामना करु : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रावर घोंघावणाऱ्या चक्रीवादळाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओच्या माध्यामातून जनतेशी संवाद साधला आहे (CM Uddhav Thackeray on Nisarga Cyclone).

Nisarga Cyclone | निसर्ग परीक्षा घेतोय, ताकदीने सामना करु : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Jun 02, 2020 | 8:48 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रावर घोंघावणाऱ्या चक्रीवादळाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओच्या माध्यामातून जनतेशी संवाद साधला (CM Uddhav Thackeray on Nisarga Cyclone). यावेळी त्यांनी निसर्ग आपली परीक्षा घेत आहे, मात्र आपण ताकदीने याचा सामना करु असं म्हटलं. प्रशासनाच्या सज्जेतेची माहिती दिली. तसेच नागरिकांनाही सुरक्षेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्याचंही नमूद केलं. तसेच केंद्र सरकार या संकटाचा सामना करण्याच्या कामात सोबत असल्याचं म्हटलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, “चक्रीवादळ आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी ओसरावं किंवा हवेतच नाहीसं व्हावं, अशी माझी प्रार्थना आहे. या प्रार्थनेला यश मिळेल, पण जे काही दिसत आहे ती शक्यता पाहिल्यानंतर हे वादळ उद्या (3 जून) दुपारपर्यंत आपल्या किनाऱ्यावर धडकणार आहे. किनारपट्टी आणि जवळील भागात चक्रीवादळाचा परिणाम होईल. आपण सज्ज आहोतच. तीनही दलांना सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे. त्याप्रमाणे एनडीआरएफच्या 15 तर एसडीआरएफच्या 4 तुकड्या अशा एकूण 19 तुकड्या विविध भागांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.”

Live Updates:

  • जिथे आवश्यक नसेल तिथे विजेची उपकरणं वापरु नका, बॅटरीवरील चालणारी उपकरणे चार्ज करुन ठेवा, वादळ आल्यानंतर जर वीजपुरवठा खंडित झाला तर अडचण नको, निसर्ग परीक्षा घेतोय, त्याला आपण ताकदीने सामोरं जाऊ.
  • स्थानिक प्रशासन सज्ज आहे, प्रशासनाला सहकार्य करा, सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची आवश्यकता असेल, तर त्याची सोय केलेली आहे
  • बीकेसी कोव्हिड रुग्णालयातील रुग्णांना इतरत्र हलवलं आहे, वादळाने शेडला धोका झाला तर परत बांधता येईल, पण कोणाला इजा पोहोचली नसली पाहिजे
  • पिण्याच्या पाण्याचा साठा करुन ठेवा, आवश्यक नसलेली विद्युत उपकरणे बंद ठेवा
  • कोरोनाचं संकट रोखून त्याला परतवण्याच्या मार्गावर आहोत, आता हे वादळाचं संकटही परतवून लावू, धैर्याने त्याचा सामाना करु, संकटाच्या छाताडावर पाय ठेवून ते परतवून लावू

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “अतिरिक्त मदत म्हणून आणखी 5 तुकड्या ठेवल्या आहेत. याशिवाय देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी एकूण आढावा घेतला. यावेळी त्यांनी केंद्र सरकार पूर्ण ताकदनीशी आपल्यासोबत आहे, असं सांगितलं. थोड्या वेळापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला होता. त्यांनीदेखील केंद्र सरकार तुमच्यासोबत आहे, असं सांगितलं आहे. किनारपट्टी परिसरात उद्या आणि परवा हे दोन दिवस महत्त्वाचे आहेत. दोन्ही दिवस आपण घरामध्येच राहणं हे हिताचं आहे. जे काही उद्योग सुरु झाले आहेत ते उद्या आणि परवा बंद राहतील. कुणीही घराबाहेर पडू नका. घराबाहेर न पडणं यातच आपलं हीत आहे. मनुष्य आणि प्राणहानी कमीत कमी व्हावी किंवा होवूच नये, अशा पद्धतीने आपण तयारी केलेली आहे.”

किनारपट्टीतील सर्व मच्छिमारांशी संपर्क झाला आहे. पालघरमधील मच्छीमार दुपारपर्यंत संपर्कात नव्हते. पण आता त्यांच्याशी देखील संपर्क झाला आहे. त्यांना सर्वांना वेळेमध्ये परत आणण्याचा आपला प्रयत्न आहे. ते सर्व वेळेवर येतील. सर्व मच्छिमार घरोघरी परतले आहेत. पुढचे दोन दिवस समुद्रात जायचं नाही. काही गोष्टींची खबरदारी घेणं जरुरीचं आहे. अलिबागला जरी हे वादळ धडकण्याची शक्यता असली तरी मुंबईपासून थेट सिंधुदुर्ग आणि पालघरपर्यंत सर्वांनी काळजी घ्यायची आहे. हे वादळ किनारपट्टीवर धडकल्यानंतर आपल्या भूभागात कसं जाणार, याची दिशा तेच ठरवणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सावध राहायला हवं. खासकरुन ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांनी घराबाहेर पडलेल्या टोकदार वस्तू जिथल्या तिथे व्यवस्थित बांधून ठेवा, जेणेकरुन वाऱ्याच्या प्रभावाने ते उडणार नाही आणि कुणाला इजा होणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“पाऊस आणि वादळ सुरु झाल्यानंतर अनावश्यक विजेचे उपकरणं वापरु नका”

उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या. ते म्हणाले, “वादळ म्हटल्यावर पाऊसही आलाच. मुसळधार पाऊसही पडणार आहे. हा पाऊस पडल्यानंतर अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये. पण पाऊस पडल्यानंतर काही ठिकाणाची विज काही काळासाठी खंडीत करावी लागेल. त्याहीपेक्षा मी महत्त्वाचं सांगेल, जिथे आवश्यकता नसेल तिथे विजेचे उपकरणं वापरु नका. पाऊस आणि वादळ सुरु झाल्यानंतर अनावश्यक विजेचे उपकरणं वापरु नका. आपल्याकडे घरी ज्या गोष्टी बॅटरीवर चालणार असतील त्या चार्ज करुन ठेवा. मग ते फोन असतील किंवा इतर उपकरणं असतील जेणेकरुन वीज पुरवठा खंडीत झाला तर अडचण यायला नको.”

कोरोनाचं संकट होतं, तरीही निसर्ग परीक्षा घेण्याचा सोडत नाही. या परीक्षेमध्ये आपण पूर्ण ताकदीने सामोरे जावून बाहेर पडायचं आहे. त्यामुळे सर्व जीवनाश्यक वस्तू एकत्र करुन हातात येथील अशा ठिकाणी ठेवा, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनतेला 5 महत्त्वाच्या सूचना

  • घराबाहेर असलेल्या सैल वस्तू बांधून टाका किंवा घरात ठेवा.
  • महत्त्वाचे दस्तऐवज व्यवस्थित एकत्रित करुन ठेवा.
  • बॅटरीवर चालणारे उपकरणं, पॉवर बँक चार्ज करुन ठेवा.
  • दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या सूचनांकडे लक्ष ठेवा.
  • अफवा अजिबात पसरवू नका.

स्थानिक प्रशासन सगळीकडे सज्ज आहे. स्थानिक प्रशासनाने अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहेत. प्रशासन दक्ष आहे, प्रशासन चांगली जबाबदारी पार पाडत आहे. नागरिक देखील प्रशासनाला सहकार्य करत आहे. मी सर्वांना विनंती करतो, प्रशासनाला सहकार्य करा. प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा, असं उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं.

“कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना इजा होऊ देणार नाही”

उद्धव ठाकरे यांनी यावेळी नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “आपल्या राज्यामध्ये कोरोनावर उपचार करण्यासाठी काही जम्बो फॅसिलिटी केल्या आहेत. फिल्ड हॉस्पिटल तयार करण्यात आले आहेत. बांद्रा-कुर्ला संकुल येथे मोठं 1 हजार बेड्सचं फिल्ड हॉस्पिटल तयार करण्यात आलं आहे. मात्र, काल जेव्हा चक्रीवादळाची माहिती आली तेव्हा तिथे असलेल्या रुग्णांना दुसरीकडे हलवलं आहे. पडलेल्या शेड बांधता येतील पण मला कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना इजा होऊ द्यायचा नाही. कोणत्याही शेड्समध्ये जाऊ नका. प्रशासनाने निश्चित केलेल्या भागातच स्थलांतरित व्हा. पिण्याच्या पाण्याचा साठा करुन ठेवा.”

हे वादळ उद्या साधारणत: दुपारपर्यंत येण्याची शक्यता आहे. ते भूप्रदेशात आल्यानंतर सर्व माहिती शासनाकडून रेडीओ आणि दुरदर्शनद्वारे दिली जाईल. घाबरुन वेळेवाकडे पाऊल टाकू नका. अत्यंत धैऱ्याने कोरोनाचं संकंट रोखून धरलं आहे आणि त्याला परतवण्याच्या मार्गावर आहोत, तसंच हे संकंट थोपवून त्यातून सही सलामत बाहेर पडू, असा मला आत्मविश्वास आहे, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Nisarga Cyclone | 3 जून दुपारी अलिबाग ते वरळी, 4 जून मध्यरात्री 2 वणी ते शिरपूर, धुळे मार्गे मध्य प्रदेश

Cyclone Nisarga : रायगडमधील ‘या’ समुद्र किनाऱ्यावर चक्री वादळाची शक्यता

Cyclone Nisarga live : रायगड समुद्र किनारी दुपारी 12 च्या सुमारास वादळ धडकण्याची शक्यता

CM Uddhav Thackeray on Nisarga Cyclone

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.