VIDEO | रेल्वे ट्रॅकवर चिमुरड्याचा जीव वाचवणाऱ्या देवदूताची मुख्यमंत्र्यांकडून दखल, मयुर शेळकेला ठाकरेंचा फोन
रायगड जिल्ह्यातील वांगणी रेल्वे स्थानकातील देवदुतामुळे लहानगा बचावल्याची घटना नुकतीच समोर आली होती. (Uddhav Thackeray praises Mayur Shelke )
मुंबई : वांगणी स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या लहानग्याची थरारक सुटका करणारा देवदूत मयुर शेळके (Mayur Shelke) याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मयुरच्या शौर्याची दखल थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही घेतली. मयुर शेळकेला फोन करुन उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं. “तुमचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. कल्पनेच्या पलिकडचं काम केलंत तुम्ही” अशा शब्दात ठाकरेंनी मयुरला कौतुकाची थाप दिली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याने अवघ्या सात सेकंदात रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या चिमुकल्याचे प्राण वाचवले होते. मध्य रेल्वेने त्याला 50 हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करत सन्मानित केलं. (CM Uddhav Thackeray praises pointsman Mayur Shelke who saved child on Vangani Railway Track)
काय झाला संवाद?
उद्धव ठाकरे : जय महाराष्ट्र
मयुर शेळके : जय महाराष्ट्र साहेब
उद्धव ठाकरे : तुमचा थरारक व्हिडीओ पाहिला.. बापरे
मयुर शेळके : धन्यवाद साहेब धन्यवाद
उद्धव ठाकरे : नाही नाही, हे म्हणजे… माझ्याकडे शब्द नाहीत.. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुम्ही त्या मुलाचा जीव वाचवलात. आईचे खूप आशीर्वाद मिळाले असतील
मयुर शेळके : नक्कीच… धन्यवाद साहेब
उद्धव ठाकरे : नीट काळजी घ्या, तुमचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत… कल्पनेच्या पलिकडचं काम केलंत तुम्ही
मयुर शेळके : तुमच्या कौतुकाने नक्कीच मला कुठेतरी अभिमान वाटतोय. तुम्ही वेळात वेळ काढून माझं कौतुक केलंत
उद्धव ठाकरे : तसंच काम केलंत तुम्ही (Uddhav Thackeray praises Mayur Shelke )
मयुर शेळके : तुम्ही कोव्हिड काळात समाजासाठी जे काम करताय, त्याच्यातूनच आम्हाला प्रेरणा मिळते
उद्धव ठाकरे : नक्कीच आपण सगळे चांगलं काम करु, नीट राहा, जय महाराष्ट्र
मयुर शेळके : जय महाराष्ट्र साहेब
ऐका संवाद :
नेमकं काय घडलं ?
रायगड जिल्ह्यातील वांगणी रेल्वे स्थानकातील देवदुतामुळे लहानगा बचावल्याची घटना नुकतीच समोर आली होती. सात वर्षांचा चिमुकला मुलगा अंध आईसोबत चालताना चुकून रेल्वे ट्रॅकवर पडला. इतक्यात समोरुन भरधाव वेगाने एक्स्प्रेस येत होती. आई जीवाच्या आकांताने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. तेव्हा रेल्वेचा पॉईंटमन मयुर शेळके देवदुतासारखा मायलेकाच्या मदतीला धावून आला. आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने अवघ्या सात सेकंदात चिमुकल्याचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
Video : अंध आईच्या हातातला मुलगा चालता चालता रेल्वे ट्रॅकवर पडला आणि तेवढ्यात रेल्वे आली…
अपघातग्रस्त कारच्या मदतीला थांबलेल्या मर्सिडीजला धडक, दोघा देवदूतांचा मृत्यू, नगरसेवक सुखरुप
(CM Uddhav Thackeray praises pointsman Mayur Shelke who saved child on Vangani Railway Track)