CM Uddhav Thackeray PC : लस म्हणजे धुवाँधार पावसातील छत्री, मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे मुद्दे

महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदे घेत राज्याच्या स्थितीची माहिती देताना उपाय योजनांवर भाष्य केलं.

CM Uddhav Thackeray PC : लस म्हणजे धुवाँधार पावसातील छत्री, मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे मुद्दे
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 9:25 PM

मुंबई : महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्याच्या स्थितीची माहिती देताना उपाय योजनांवर भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक असल्याचं सांगत यावर लस हीच धुवाँधार पावसातील छत्री असल्याचं मत व्यक्त केलं. याचनिमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे खालीलप्रमाणे (CM Uddhav Thackeray press conference 2 April 2021 10 important points on Corona Vaccination and Lockdown).

1. राज्यातील कोरोना सुविधा संपण्याच्या मार्गावर

उद्धव ठाकरे म्हणाले, “आज मुंबईतील 800 रुणांची संख्या 8500 झालीय. आज राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 45 हजार किंवा त्यापेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. 2 लाख 20 हजार विलगीकरणाचे बेड आहेत. त्यातील 62 टक्के भरले. आयसीयू बेड 48 टक्के भरले, ऑक्सिजन बेड 25 टक्के भरलेत, व्हेंटिलेटर 25 टक्के वापरता आलेत. ही परिस्थिती चिंताजनक आहे म्हणून मी तुमच्याशी बोलायला आलो.”

2. ‘लॉकडाऊन आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी आणि आगामी 15-20 दिवसात सुविधा अपुऱ्या पडतील’, उद्धव ठाकरेंचा सूचक इशारा

“आणखी 15-20 दिवसात पुन्हा राज्यातील सुविधा अपुऱ्या पडतील. काहीजण म्हणतील सुविधा वाढवत का नाही? मी आदेश दिले आहेत ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी सुविधा वाढवाव्यात. सुविधा वाढवणं म्हणजे बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनचा साठा, आरोग्य व्यवस्था उभ्या करण्याची वेळ येणार आहे,” असंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

3. लस म्हणजे धुवाँधार पावसातील छत्री, पण आत्ता पाऊस नाही तर वादळही

उद्धव ठाकरे म्हणाले, “कोरोना लस ही धुवाँधार पावसात छत्री असावी तशी आहे. पण आत्ता केवळ पाऊस नाही तर वादळही आहे. या वादळाच्या स्थितीत लस घेणं ही आपल्याकडील छत्री आहे. त्यातल्या त्यात कमीत कमी भिजावं म्हणून कोरोना लसीचा उपयोग होणार आहे. लस घेणं, चाचण्या वाढवणं हा उपाय मी मानायला तयार नाही. कारण जितक्या चाचण्या होतात तितकी रुग्णसंख्या कळायला मदत होते, परंतू रुग्णवाढ थांबवण्यासाठी कुणी उपाय सांगत नाही.”

4. संपूर्ण देशात लस देण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

“देशात आपलं राज्य कोरोना लस देण्यात नंबर एकचं राज्य आहे. आजच्या (2 एप्रिल) दिवशी आपण 3 लाख नागरिकांना कोरोना लस दिली आहे. ज्या क्षणी आपल्याला लसीचा पुरवठा वाढेल तेव्हा ही क्षमता आपण दुपटी तिपटीने वाढू शकतो इतकी आपली ताकद आहे.”

5. आरोग्य यंत्रणा ट्रॅकिंग, टेस्टिंग, ट्रेसिंगमध्ये व्यस्त

उद्धव ठाकरे म्हणाले, “आरोग्य यंत्रणा ट्रॅकिंग, टेस्टिंग, ट्रेसिंगमध्ये व्यस्त आहे. हीच यंत्रणा उपचारांमध्ये आणि लसीकरणातही व्यस्त आहे. त्यामुळे त्यांची काय अवस्था होत असेल याचा आपण थोडा विचार करावा.

6. कोरोना मोठ्या राक्षसापेक्षा दुप्पट, तिप्पट आक्राळविक्राळ रूप धारण करून आला

“जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत कोरोना कोरोना काय आहे, असं आपल्याला वाटतं होतं. गेल्या वर्षीही अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, याही वर्षी तीच परिस्थिती आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाची आर्थिक परिस्थिती ही दोलायमान झालेली आहे. त्या परिस्थितीचा विचार करून महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी एक चांगला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. महाराष्ट्र पुढे नेणारा, संकटातही थांबणार नाही, थांबलो नाही हे दाखवणारा अर्थसंकल्प आपण मांडला.”

“होळी, धुलीवंदन पार पडल्यानंतर राज्यात शिमग्याला सुरुवात झाली. मार्चमध्ये कोरोना मोठ्या राक्षसापेक्षा दुप्पट, तिप्पट आक्राळविक्राळ रूप धारण करून आलेला आहे. हा विषाणू वेगवेगळे अवतार धारण करून आपल्याला संकटात टाकतोय आणि आपली परीक्षा बघतोय. आपल्या राज्यात फक्त दोनच या विषाणूंची चाचणी होऊ शकते अशा प्रयोगशाळा होत्या. एक मुंबईतील कस्तुरबा आणि दुसरी पुण्याला एनआयव्ही, आज त्या दोनाच्या जवळपास 500 संस्था तयार केल्यात.”

7. मी आपल्याला घाबरवण्यासाठी आलेलो नाहीये

“मी आपल्याला घाबरवण्यासाठी आलेलो नाहीये. यातून आपल्या सर्वांना मार्ग कसा काढायचा. मार्ग काढण्यासाठी म्हणून मी आपल्याशी संवाद साधतोय. आपण एका विचित्र विषाणूबरोबर लढतोय. मार्चमध्ये प्रथम कोविडने आपल्या महाराष्ट्रात शिरकाव केलाय. हा हा म्हणता एखाद्या मायावी राक्षसासारखा त्याने महाराष्ट्र नव्हे, तर संपूर्ण देश व्यापून टाकलाय. मधल्या काळात आपण सर्वजण मिळून या व्हायरसला रोखण्यात नक्कीच यशस्वी झालो होतो. हे युद्ध आपण सगळ्यांनी हातात हात घालून लढलो म्हणून ती परिस्थिती निर्माण झाली.”

8. लॉकडाऊन पर्याय नाही मान्य, मग करायचं काय तो पर्याय सांगा

“कडक निर्बंध लावावे लागतील, उद्या परवा जाहीर करु, गर्दी टाळावी लागेल, ऑफिसेसना नियमावली हवी, बसना नियम, रेल्वे, बस तुडुंब आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेली तर ब्राझीलसारखा शुकशुकाट दिसेल. रोजगारही गेला आणि जीवही गेला. तसं होऊ नये. येत्या दोन तीन दिवसात मी पुन्हा बोलेन. मी तज्ज्ञांशी बोलेन, मला पर्याय सांगा, लॉकडाऊन पर्याय नाही मान्य, मग करायचं काय जरुर सांगा.”

9. आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू, आज पूर्ण लॉकडाऊन इशारा देतोय

पहिला जीव वाचवायचा आहे, आज इशारा देतोय, पूर्ण लॉकडाऊनचा, दोन दिवसात दृश्य परिणाम दिसला नाही, किंवा दुसरा पर्याय मिळाला नाही, तर जगामध्ये जे सुरु आहे, पहिला लॉकडाऊन, दुसरा लॉकडाऊन होतोय.. त्यामुळे आता ठरवायला हवं, ही लाट मी रोखेनच पण पुढची लाट येऊ देणार नाही.

10. तर दोन दिवसात महाराष्ट्रात लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांचा मोठा इशारा

“कोरोनाची दहशत गेल्याने आपण गाफील झालो. अजूनही कोरोनाने मात केलेली नाही. आपणत त्यांच्यावर मात करायची आहे. मी सर्व राजकारण्यांना विनंती करतो, कृपा करा जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करु नका. सरकार जे पावलं उचलत आहे ते जनतेच्या हितासाठी उचलत आहे. आपल्याला जनतेचं जीव वाचवायचं आहे. मी आजसुद्धा लॉकडाऊनचा इशारा देतोय. मी दोन दिवस परिस्थिती बघतोय. आतापासून आपण ठरवूया. ही लाट रोखेलच पुढची लाटही रोखूया”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा :

Uddhav Thackeray speech highlights : आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू, आज पूर्ण लॉकडाऊन इशारा देतोय

Maharashtra second Lockdown : महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात निर्बंध लागणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

माझ्या औषधाला परवानगी द्या, कोरोना झटक्यात बरा करतो, पुण्यातील डॉक्टरचं थेट आयुष मंत्रालयाला आवाहन

व्हिडीओ पाहा :

CM Uddhav Thackeray press conference 2 April 2021 10 important points on Corona Vaccination and Lockdown

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.