नामांतराचा मुद्दा तापला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्याकडे साऱ्यांच्या नजरा
त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. (CM Uddhav Thackeray To Visit Aurangabad)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा प्रचंड तापला आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या औरंगाबाद दौरा करणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. (CM Uddhav Thackeray To Visit Aurangabad)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या (शुक्रवार 5 फेब्रुवारी 2021) औरंगाबादचा दौरा करणार आहे. उद्या सकाळी उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानवरुन निघणार आहे. सकाळी नऊ वाजता ते औरंगाबाद येथे दाखल होती. त्यानंतर लोणार सरोवराची पाहणी करणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा औरंगाबाद दौरा कसा असेल?
सकाळी 8.55 औरंगाबाद विमानतळ आगमन 9.00 हेलिकॅाप्टरने लोणार 9.30 लोणार आगमन 9.30 ते 10.15 लोणार सरोवर पाहणी 10.15 ते 10.45 लोणार सरोवर संवर्धन व विकास बाबत सादरीकरण (MTDC विश्रामगृह) 11.45 औरंगाबाद विमानतळ आगमन दुपारी 12.05 औरंगाबाद पाणीपुरवठा योजनांतर्गत दिल्ली गेट जलकुंभ कामांची पाहणी 12.20 जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक दुपारी 1.45 वा विमानाने मुंबईकडे प्रयाण
मनसेचा औरंगाबादेत राडा
एकेकाळी मंत्र्यांच्या गाड्या अडवणाऱ्या शिवसेनेच्याच मंत्र्यांच्या गाड्या आता मनसेने अडवायला सुरुवात केली आहे. औरंगाबादच्या नामांतरावरून आज (4 फेब्रुवारी) मनसेने शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवली. त्यांना जाब विचारला आणि त्यांच्या अंगावर पत्रकं फेकून जोरदार घोषणाबाजीही केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच मनसेने राडा केला आहे. त्यामुळे औरंगाबादेत मनसेचं बळ वाढत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
औरंगाबादचं नामांतर ‘संभाजीनगर’ असं करण्याचा अल्टिमेटम मनसेने शिवसेनेला दिला होता. हा अल्टिमेटम संपला तरी राज्य सरकारने काहीच निर्णय न घेतल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. चंद्रकांत खैरे यांची गाडी क्रांती चौकातून जाणार असल्याचं कळल्यानंतर शेकडो मनसेसैनिक हातात झेंडे घेऊन क्रांती चौकात दाखल झाले. मनसे सैनिकांनी खैरे यांची गाडी येताच त्यांच्या गाडीला घेराव घातला आणि जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली.
शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदिप पुरी यांना पाठवत औरंगाबाद विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज असं नामांतर करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी काँग्रेसला औरंगजेब तुमचा आदर्श आहे का? असा रोखठोक सवाल केला आहे. त्यामुळे शिवसेना औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट झालं आहे.
नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध
शिवसेनेच्या या मागणीला राज्य सरकारमध्ये सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसनं विरोध केला आहे. नाव बदलणं हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं. (CM Uddhav Thackeray To Visit Aurangabad)
संबंधित बातम्या :
मनसेचा औरंगाबादेत राडा, चंद्रकांत खैरेंची गाडी अडवली; घेराव घालून विचारला जाब
आदित्य ठाकरे म्हणजे आजोबांच स्वप्न पूर्ण करणारा, वाघाच हृदय असणारा खरा नातू: मुनगंटीवार