Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीनं झालेल्या नुकसानाची पाहणी करणार
उद्धव ठाकरे कोल्हापूरमधील (Uddhav Thackeray Kolhapur visit) पूर परिस्थितीची पाहणी करतील आणि प्रशासनासमवेत आढावा बैठक घेणार आहेत.
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे कोल्हापूरमधील (Uddhav Thackeray Kolhapur visit) पूर परिस्थितीची पाहणी करतील आणि प्रशासनासमवेत आढावा बैठक घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा यापूर्वी हवामान विभागानं कोल्हापूरला रेड अॅलर्ट दिल्यानं रद्द करण्यात आला होता. उद्या सकाळी 8.40 वाजता मुख्यमंत्री कोल्हापूरकडे जाण्यासाठी मातोश्री निवासस्थानावरुन निघतील.
Maharashtra CM Uddhav Thackeray to visit flood-affected areas of Kolhapur tomorrow
As per the State Emergency Operation Centre, Disaster Management Unit data, 213 people died due to flood/heavy rainfall in various places across the state
(File pic) pic.twitter.com/eNH3ncqswu
— ANI (@ANI) July 29, 2021
मुख्यमंत्र्यांचा दौरा कसा असेल?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी ८.४० वा. मातोश्री निवासस्थान येथून मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्टरीय विमानतळ, सांताक्रूझकडे रवाना होतील. विमान तळावरुन कोल्हापूरला जातील. कोल्हापूर विमानतळावरुन मोटारीने शिरोळ-नृसिंहवाडी रोडकडे रवाना होतील. शिरोळ-नृसिंहवाडी रोड येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी करतील. त्यानंतर शाहूपूरी ६वी गल्ली, कोल्हापूर नाईक अॅण्ड कंपनी येथे पुरामुळे बाधित झालेल्या भागाची पाहणी करतील. त्यानंतर पंचगंगा हॉस्पीटल गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता येथील पुरामुळे बाधीत भागाची पाहणी करतील. कोल्हापूरमधील पूरबाधित भागाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 11 ते 1.30 पर्यंत करतील.
मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 2 वाजता कोल्हापूरमधील पूरस्थितीसंदर्भात आढावा बैठक घेतील. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होईल. उद्धव ठाकरे दौरा आटोपून मुंबईकडे रवाना होतील.
शेतीचं सुमारे 66 कोटींचं नुकसान
महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शेतीचं सुमारे 66 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुरामुळे 58 हजार 500 हेक्टर जमिनीवरील पिके बाधित झाली आहेत. करवीर, शिरोळ आणि हातकणंगले या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. ऊस, भात, सोयाबीन भुईमूग पिकांना सर्वाधिक नुकसान झालं आहे. शेतातील पाणी कमी झाल्यानंतरच पंचनामे केले जाणार आहेत.
कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गावरील भराव वाहून गेला
कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गावरील भराव वाहून गेला आहे. पुराचे पाणी ओसारल्याने ठिक ठिकाणी भराव वाहून गेल्याचे चित्र आहे. भराव वाहून गेल्याने पुढील काही दिवस मिरज-कोल्हापूर रेल्वेसेवा बंद राहणार आहे. एक किलोमीटरवरील भराव वाहून गेला आहे. पुलाचे स्ट्रक्टचरल ऑडिट झाल्यानंतर सेवा सुरळीत होणार आहे.
इतर बातम्या:
पूरानं नुकसान झालेल्यांना तातडीने विम्याची किमान 50 टक्के द्या, मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी
‘आम्हाला नोटीस देणं आवश्यक होतं, आमची अटक बेकायदेशीर’, राज कुंद्राच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद
CM Uddhav Thackeray to visits flood affected Kolhapur tomorrow for take review of Maharashtra rains live updates and flood loos