मुंबईत उत्तर भारतीय संघात कॅन्सर रुग्णांसाठी गेस्ट हाऊस, उद्धव ठाकरे-योगी आदित्यनाथ एकाच मंचावर येणार?
मुंबईतील उत्तर भारतीय संघात कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी गेस्ट हाऊस उभारण्यात आले आहे. (Uddhav Thackeray Yogi Adityanath)
मुंबई : मुंबईतील उत्तर भारतीय संघात कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी गेस्ट हाऊस उभारण्यात आले आहे. या गेस्ट हाऊसमध्ये 50 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या गेस्ट हाऊसचे उद्धाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामुळे उद्धव ठाकरे-योगी आदित्यनाथ एकाच मंचावर येणार आहे. (Uddhav Thackeray Yogi Adityanath Will Inaugurate guest house in Mumbai)
मुंबईत बाहेरुन येणाऱ्या कॅन्सरग्रस्त रुग्णालयाच्या उपचारासाठी उत्तर भारतीय संघात गेस्ट हाऊस उभारण्यात आले आहेत. हे गेस्ट हाऊस 6 हजार 800 स्क्वेअर फूट जागेत उभारण्यात आले आहे. यात 50 खाटांचे शयनगृह आणि 5 एसी रूम तयार करण्यात आल्या आहेत. या गेस्ट हाऊसमुळे संघाचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार आर. एन. सिंह यांचे स्वप्न साकार झाले आहे.
मे महिन्यात उद्धाटन
या गेस्ट हाऊसचे उद्घाटन येत्या मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. या उद्घाटन सभारंभाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या उद्धाटनानंतर सर्वसामान्यांसाठी ही सुविधा सुरू केली जाईल. ही सुविधा सुरू केल्याने उत्तर भारतातून येणार्या कर्करोगाच्या रुग्णांना प्रचंड दिलासा मिळणार आहे.
गेस्ट हाऊसमध्ये कोणकोणत्या सोयी?
मुंबईत इतर राज्यांतून येणार्या कर्करोगाच्या रूग्णांवर मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार होतात. त्याला आणि त्याच्या कुटुंबाला रुग्णालयाबाहेर रस्त्यावर राहावे लागतं. याच पार्श्वभूमीवर माझे वडील, संघाचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार आर.एन. सिंह यांनी अशा लोकांसाठी एक गेस्ट हाऊस उभारण्याचा निर्णय घेतला होता.
या निर्णयाला प्रत्यक्षात येण्यास दोन वर्षे लागली आहेत. हे गेस्ट हाऊस ‘ना नफा, तोटा नाही’ या तत्त्वावर चालविण्यात येणार आहे. कॅन्सर रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना अत्यंत नाममात्र दराने गेस्ट हाऊस देण्यात येईल. या व्यतिरिक्त चार धाममध्ये येणाऱ्या लोकांना गेस्ट हाऊसची सुविधादेखील देण्यात येणार आहे.
” या गेस्ट हाऊसमध्ये AC रुमही बांधण्यात आली आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला या ठिकाणी जागा देण्यात येईल. मात्र प्रथम येणाऱ्या प्राधान्य या तत्त्वावर ही सेवा दिली जाणार आहे, अशी माहिती उत्तर भारतीय संघाचे विशेष विश्वस्त संतोष सिंह यांनी दिली.
तसेच रुग्णांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना मोफत राहण्याची सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल. तथापि, आता गेस्ट हाऊसमधील प्रत्येक बेडवर किती शुल्क आकारले जाईल, याचा निर्णय संघाच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. या गेस्ट हाऊसच्या उभारणीसाठी 3 कोटी 70 लाख रुपये खर्च आला आहे, असेही संतोष सिंह म्हणाले.
रुग्णांना दिलासा
विशेष म्हणजे, टाटा कॅन्सर हॉस्पिटलसह मुंबईतील इतर रुग्णालयात उपचारासाठी उत्तर भारतीय मोठ्या संख्येने देत असतात. आर्थिक संकटात जीवन जगणार्या लोकांना राहण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. या लोकांना अडचणीतून वाचवण्यासाठी उत्तर भारतीय संघाने हे पाऊल उचलले. येथे 50 बेडचे वसतिगृह आहे. प्रत्येक व्यक्तीला समान ठेवण्यासाठी झडपांची एक प्रणाली आहे. त्यामुळे कर्करोगासह इतर प्रकारच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. (Uddhav Thackeray Yogi Adityanath Will Inaugurate guest house in Mumbai)
संबंधित बातम्या :
धनंजय मुंडे आणि संजय राठोड दोन्ही प्रकरणं वेगवेगळी, उगाच गल्लत करु नका: संजय राऊत
‘एक दिवस तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्वं करावं’, काँग्रेस नेत्याच्या जयंत पाटलांना खास शुभेच्छा