Rashmi Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकाला कोरोना
उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या एका सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण (Rashmi Thackeray Security Guard Corona Positive) झाली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर कोरोनाने धडक दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या एका सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ‘मातोश्री’ची चिंता वाढली आहे. (CM Uddhav Thackeray Wife Rashmi Thackeray Security Guard Corona Positive)
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे.
तेजस ठाकरे यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. तेजस ठाकरे यांच्यासह तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांची प्रकृती काही दिवसांपूर्वी बिघडली होती. त्यानंतर त्यांची चाचणी केली असता दोघेही ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आढळले आहेत.
तेजस ठाकरेंच्या इतर सुरक्षारक्षकांची तातडीने कोरोना चाचणी करण्यात आली. इतर सुरक्षारक्षकांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आलं आहे. यानंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी तेजस यांना काहीच झालेले नाही. त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांना बाधा झाली आहे, असे स्पष्टीकरण दिले होते.
हेही वाचा – तेजसला काहीही झालं नाही, आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण, दोन सुरक्षारक्षकांना बाधा
दरम्यान मातोश्री परिसरातील चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यावेळी त्याच्या संपर्कातील तब्बल 130 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले होते. हे सर्व पोलीस विविध शिफ्टमध्ये मातोश्रीवर ड्युटीसाठी होते. यानंतर मातोश्रीवरील तीन पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाली होती.
मातोश्रीच्या आजूबाजूला कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुतेक वेळी घरातूनच काम करत आहेत. अनेक बैठकांनाही ते व्हिडीओ कॉन्सफरसिंगद्वारे उपस्थितीत असतात. यामुळे भाजपकडून त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती. (CM Uddhav Thackeray Wife Rashmi Thackeray Security Guard Corona Positive)
VIDEO : Reshmi Thackeray | रश्मी ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण https://t.co/IGYFtovfUl
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 25, 2020
संबंधित बातम्या :
‘मातोश्री’बाहेरील आणखी तीन पोलिसांना कोरोना, 24 तासात 100 पोलिसांना कोरोना
Tejas Thackeray | मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र तेजस ठाकरेंच्या दोन सुरक्षारक्षकांना कोरोना