तेव्हा मान वर करायलाही वेळ मिळाला नाही, आता मानेचं दुखणं वाढलंय; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानदुखीचा त्रास वाढला आहे. त्यामुळे ते आज रुग्णालयात दाखल झाले आहेत. दोन ते तीन दिवस ते रुग्णालयात उपचार घेणार आहेत. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्याबाबतची माहिती दिली आहे. (cm uddhav thackeray will admitted hospital for three days)
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानदुखीचा त्रास वाढला आहे. त्यामुळे ते आज रुग्णालयात दाखल झाले आहेत. दोन ते तीन दिवस ते रुग्णालयात उपचार घेणार आहेत. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्याबाबतची माहिती दिली आहे.
उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. तसेच यावेळी त्यांनी काही शारीरिक चाचण्या केल्या होत्या.
मुख्यमंत्र्यांचं निवेदन जशच्या तसं
माझ्या बंधू, भगिनींनो आणि मातांनो
जय महाराष्ट्र!
गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे.
यानिमित्ताने एकच सांगायचं आहे. कोरोना लसींच्या बाबतीत आपण 10 कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो.
आपला नम्र
उद्धव बाळासाहेब ठाकरे
म्हणून पंढरपूरच्या कार्यक्रमाला गेले नाही
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंढरपूर येथील चौपदरी मार्गाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीसीवरून हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्या मानेल पट्टा लावण्यात आलेला होता. त्यामुळे त्यांना मानदुखीचा त्रास सुरू झाल्याचं दिसत होतं. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसतानाही ते कार्यक्रमाला हजर राहिल्याचा आवर्जुन उल्लेख केला होता.
Video | कुविख्यात गुंड मुन्ना यादवशी तुमचा संबंध काय?; Nawab Malik यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल@nawabmalikncp #NawabMalik #DevendraFadnavis #NCP #BJP #Maharashtra #Politics pic.twitter.com/4DIMtS0022
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 10, 2021
संबंधित बातम्या:
रामदास कदमांना विधान परिषदेची उमेदवारी नाहीच, ऑडिओ क्लिप प्रकरण भोवलं?; नवा उमेदवार कोण?
गुड गोईंग… मुख्यमंत्र्यांकडून मलिकांचं कौतुक; तर वरिष्ठांनी मलिकांना थांबवावं, संजय राऊतांचं आवाहन
(cm uddhav thackeray will admitted hospital for three days)