विरोधकांचं काम जनतेला भरकटवणं, मुख्यमंत्री लवकरच अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार: आदित्य ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत आहे. ते लवकरच अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसतील, असं सांगतानाच विरोधकांचं काम आरोप-प्रत्यारोप करणं आणि जनतेला भरकटवणं आहे.

विरोधकांचं काम जनतेला भरकटवणं, मुख्यमंत्री लवकरच अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार: आदित्य ठाकरे
aaditya thackeray
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 3:06 PM

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत आहे. ते लवकरच अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसतील, असं सांगतानाच विरोधकांचं काम आरोप-प्रत्यारोप करणं आणि जनतेला भरकटवणं आहे. तिकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा टोला पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यांना अभिवानद केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केलं. विरोधी पक्षाकडे न देणंच योग्य आहे. ते काही ना काही आरोप-प्रत्यारोप करत असतात. लोकांची इमेज खराब करत असतात. जनतेला भरकटवत असतात. आपल्या कामावर आपण फोकस केलेला बरा. कालपरवा जो सर्व्हे आला त्यात मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आहेत आणि जनता जनर्दन मुख्यमंत्र्यासोबत आणि आमच्या सोबत ठाम उभे आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

कोरोनाची साथ गेली नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठणठणीत आहेत. संध्याकाळी ते दिसतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच अ‍ॅक्शनमोडमध्ये दिसतील. कोरोनाची साथ अजून गेली नाही. सर्वांनी काळजी घ्या. केसेस वाढत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

बाळासाहेबांकडून स्फूर्ती घेऊन कार्य

सर्वांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. शिवसेना प्रमुखांकडून आम्ही स्फूर्ती घेऊन काम करत राहू, असं सांगतानाच बाळासाहेबांची आठवण म्हणून ट्विटरवर फोटो टाकला, असं त्यांनी सांगितलं.

पालकांनी ठरवावे

यावेळी त्यांनी शाळेच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया दिली. पालकांना वाटत असेल तर त्यांनी मुलांना शाळेत पाठवावं. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही हे पालक आणि शाळेने ठरवायचं आहे, असं ते म्हणाले.

निवडणुकीचा नारळ फोडणार?

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी आज आपल्या मतदारसंघात लोकापर्ण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचा धडाका लावला आहे. जवळपास 18 ठिकणी भूमिपूजन आणि लोकापर्ण सोहळा पार पडणार आहे. वरळी येथील नरिमन जेट्टीचे उदघाटन थोड्याच वेळात आदित्य ठाकरे यांच्याहस्ते पार पडणार आहे. त्यानंतर ते वरळी मतदार संघातील विविध ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार, शरद पवारांचं दिपाली सय्यद यांना आश्वासन

Rohit Patil | रोहित पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद मिळणार? ; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याने दिले संकेत

Aurangabad | पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.