उद्धव ठाकरे मिस्टर सत्यवादी, संजय राठोडांबाबत योग्य तो निर्णय घेतील: संजय राऊत

संजय राठोड यांच्या राजीनाम्याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊच देणार नाही, या विरोधकांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. विरोधकांना विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. | Sanjay Raut

उद्धव ठाकरे मिस्टर सत्यवादी, संजय राठोडांबाबत योग्य तो निर्णय घेतील: संजय राऊत
विरोधकांना विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, अधिवेशन होऊनच द्यायचं नाही, ही आडमुठी भूमिका लोकशाहीच्या विरोधात असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 11:50 AM

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे न्यायप्रिय नेते आहेत. ते मिस्टर सत्यवादी आहेत. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणात ते संपूर्ण सत्य जाणून घेऊन योग्य तो निर्णय घेतील, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Rathod) यांनी केले. लोकशाहीत विरोधकांना आंदोलन करण्याचा हक्क आहे. मात्र, कोरोनाच्या काळात प्रत्येकाने लोकशाहीच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले. (Shivsena Leader Sanjay Raut on Sanjay Rathod matter)

ते शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊच देणार नाही, या विरोधकांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. विरोधकांना विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, अधिवेशन होऊनच द्यायचं नाही, ही आडमुठी भूमिका लोकशाहीच्या विरोधात असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

‘किशोर वाघ यांच्याबाबत मला काहीही माहिती नाही’

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर कारवाई करण्यासाठी महाविकासआघाडी सरकारविरुद्ध रान उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली. त्यावर राऊत यांनी फार बोलण्यास नकार दिला. हे प्रकरण सरकारी स्तरावरील आहे. मला या विषयाची पूर्ण माहिती नाही. त्यामुळे यावर बोलणे योग्य नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

संजय राठोडांची विकेट पडणार? पुढील 48 तास महत्वाचे

विधिमंडळ अधिवेशनाला आता अवघे काही तास उरलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर (Will Sanjay Rathod Resign From His Position) विरोधक आक्रमक झाले आहेत. वनमंत्री संजय राठोड यांच्यासाठी पुढचे 48 तास महत्वाचे असून पक्षानं त्यांना ‘निर्णय’ घेण्याच्या सुचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

संजय राठोड यांच्यासमोरचे पर्याय संपले?

पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप आहेत. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे त्याचं राजकीय महत्वही मोठं आहे. ह्या संपूर्ण प्रकरणात संजय राठोड पंधरा दिवस जनतेसमोर आले नाहीत त्यामुळे संशय जास्त बळावत गेला. समोर आल्यानंतरही त्यांनी थेट शक्तीप्रदर्शन केलं त्यामुळे आघाडीतल्या सहयोगी नेत्यांची नाराजी ओढवून घेतली. त्याच दबावामुळे मातोश्री नाराज झाली. संजय राठोडांनी जातीय आधार घेण्याचा केलेला प्रयत्नही जनतेला रुचलेला नाही. त्याचे पडसाद सोशल मीडियात जोरदार उमटत आहेत. त्यातून मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होत असल्याचं दिसतं आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांच्याकडे चौकशी होईपर्यंत पदावरुन दूर हटण्याशिवाय काहीही पर्याय नसल्याचं जाणकारांना वाटतं. संबंधित बातम्या :

नियम सर्वांना सारखेच, पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश, संजय राठोड म्हणतात….

नियम मोडला तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत: संजय राऊत

(Shivsena Leader Sanjay Raut on Sanjay Rathod matter)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.