Cm Uddhav Thackeray : झुकेंगे नहीं म्हणणाऱ्या फायरब्रँड आजीला मुख्यमंत्री भेटणार, सोशल मीडियावरही जोरदार हवा
80 वर्षांच्या चंद्रभागा शिंदे आज्जी यांच्या घरी आज संध्याकाळी 5:30 वाजता शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) दाखल होत भेट घेणार आहेत. तसेच सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही सदिच्छा भेट देणार आहेत.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून एक आजी चांगलीच (Chandrabhaga Shinde Video) चर्चेत आहे. झुकेंगे नहीं (Pushpa), म्हणत शिवसेनेच्या रणरागिणी ‘फायर’ आज्जींचा रुद्र अवतार गेले दोन दिवस महाराष्ट्राने पाहीला. या आजीने हटके स्टाईलने शिवसेनेच्या विरोधकांना जोरदार इशारा दिला आहे. त्या 80 वर्षांच्या चंद्रभागा शिंदे आज्जी यांच्या घरी आज संध्याकाळी 5:30 वाजता शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) दाखल होत भेट घेणार आहेत. तसेच सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही सदिच्छा भेट देणार आहेत. त्यामुळे या आजीसाठीही हा मोठा दिवस असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या आजीच्या स्टाईलची बरीच चर्चा रंगत आहे.मुंबईत शिवसैनिकांनी आज सकाळी राणा दाम्पत्याच्या घरासमोर आंदोलन केलं, यावेळी या आजी उपस्थित होत्या.
आंदोलनावेळी आजींचं विरोधकांना आव्हान
यावेळी आजीबाई आक्रमकपणे बोलातना पाहायला मिळाल्या. राणा दाम्पत्याच्या हनुमान चालीस पठणावेळी मातोश्रीची रक्षा करण्यासाठी आल्या आहेत, असं त्यांच्या वागण्यातून जाणवत होतं. या आजीबाईंनी शिवसेनेच्या वतीने पुष्पा स्टाईलमध्ये राणा दाम्पत्याला प्रत्युत्तर दिल्याचेही यावेळी दिसून आले. हाच व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिग आहे. यावेळी मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी शिवसेना झिंदाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी तिथे एक आजीबाईही या आंदोलकात उपस्थित होत्या. त्यांना आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीमध्ये बोलावून घेतलं, त्यानंतर मात्र या आजींच्या आनंदाला पारावर उरला नाही. तसेच आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधल्यानंतर या आजींनी बाहेर येताच पुष्पा स्टाईलने विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. पुष्पाची मै झुकेगा नहीं साला हा डायलॉग म्हणत त्यांनी शिवसैनिक माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं, त्यानंतर या आजी चर्चेत आल्या आहेत.
भेटीची जोरदार चर्चा
आता मुख्यमंत्री अशा शिवसैना प्रमींच्या भेटीला जाणार असल्याने या भेटीची सध्या जोरदार चर्च आहे. एकिकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. त्यांना मिळणाऱ्या पुरस्कारावेळी मुख्यमत्री उपस्थित राहणार नाही, कारण पत्रिकेवर त्यांचं नाव नसल्याची माहिती समोर आली आहे. कालपासून या भेटीची चर्चा होती, मात्र या आजी आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीची आता जास्त चर्चा आहे.
Kirit Somaiya : हायव्होल्टेज ड्राम्याप्रकरणी 10 ते 12 शिवसैनिकांना अटक, कारवाई काय होणार?