Bhandara Hospital Fire | मुख्यमंत्र्यांचा भंडारा दौरा, दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाच्या पाहणीसह पालकांचेही सांत्वन
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची पाहणी करणार आहे. (CM Uddhav Thackeray Will Visit Bhandara hospital 10 January)
मुंबई : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डला मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत 17 नवजात बाळांपैकी 10 बालकांचा मृत्यू झाला. या मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच याप्रकरणी चौकशीही करण्यात येणार आहे. दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची पाहणी करणार आहे. (CM Uddhav Thackeray Will Visit Bhandara hospital 10 January)
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (10 जानेवारी) सकाळी 7.30 वाजता वर्षा बंगल्यावरुन भंडाराकडे रवाना होतील. दुपारी 12 वाजता ते भंडारा जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पहाणी करणार आहेत. यानंतर ते नवजात बालकं गमावलेल्या पालकांचे सांत्वन करुन त्यांना दिलासा देतील.
नेमकं प्रकरणं काय?
भंडारा इथं सरकारी रुग्णालयात मध्यरात्री अग्नितांडव झालं. भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 बाळांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. शुक्रवारी मध्यरात्री 2च्या सुमारास ही आग लागली. या आगीतून 7 बाळांना वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला.
उद्याच्या उद्या 5 लाख, दोषींना सोडणार नाही : राजेश टोपे
या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उद्याच्या उद्या मदत पोहोचवली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
“या घटनेची चौकशी करण्यासाठी साधना तायडे यांच्या नेतृत्त्वात समिती तयार केली आहे. यामध्ये विविध तज्ज्ञ आहेत. सहा लोकांची समिती या घटनेची चौकशी करेल,” असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
भंडारा आगीची घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ८ मुली आणि २ मुलं अशी दहा बालकं दगावली. निष्पाप बालकं गेली. ही बालकं बाहेर जन्मली होती, मात्र जन्मत: कमी वजन आणि ऑक्सिजनचा कमी पुरवठा अशी ही बालकं होती, त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरु होते. रात्री शॉर्ट सर्किटने स्पार्क झाला आणि अचानक स्फोट झाला. काळ्या धुरामुळे काहीही दिसत नव्हतं. हा धूर बालकांच्या वॉर्डमध्येही घुसला. सात बालकांना वाचवण्यात यश आलं, असेही राजेश टोपेंनी म्हटलं. (CM Uddhav Thackeray Will Visit Bhandara hospital 10 January)
संबंधित बातम्या :
BREAKING | भंडाऱ्यात देश हादरवणारी घटना, सरकारी रुग्णालयात आग, 10 बाळं दगावली
Bhandara Fire : घरी जाऊन मातांचं सांत्वन, उद्याच्या उद्या 5 लाख, दोषींना सोडणार नाही : राजेश टोपे