CNG PNG Price : जोरदार पावसासह मुंबईकरांना अजून एक झटका; सीएनजी-पीएनजी झाले महाग; आजपासून खिशावर भार

CNG PNG Price Hike in Mumbai : महानगर गॅस लिमिटेडने मुंबईत सीएनजी आणि पीएनजीचे भाव वाढवले आहेत. सीएनजीच्या किंमतीत 1.50 रुपये प्रति किलोग्रॅमची वाढ करण्यात आली आहे. अगोदरच पावसाने थैमान घातले असताना ग्राहकांवर दरवाढीचे संकट आले आहे.

CNG PNG Price : जोरदार पावसासह मुंबईकरांना अजून एक झटका; सीएनजी-पीएनजी झाले महाग; आजपासून खिशावर भार
सीएनजी-पीएनजी झाले महाग
Follow us
| Updated on: Jul 09, 2024 | 9:08 AM

मुंबईला पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यातच महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या किंमतीत वाढ केली असून नवे दर आज, मंगळवारपासून अमलात येतील. सीएनजी 1,50 रुपयांनी, तर पीएनजी 1 रुपयाने महाग झाले आहे. सीएनजी, पीएनजीच्या दरवाढीने ग्राहकांना वाहन चालवण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी अधिक खर्च येणार आहे. एकाचवेळी दोन्ही इंधन महागल्याने मुंबईकरांच्या खिशावर आता भार येणार आहे.

मुंबईकरांचे अंदाजपत्रक कोलमडणार

नव्या दरानुसार, मुंबईकरांना एक किलो सीएनजीसाठी ७५ रुपये तर घरगुती पीएनजीसाठी ४८ रुपये मोजावे लागतील. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजीचे दर कमी असले तरी मुंबईतील बऱ्याच टॅक्सी व रिक्षा सीएनजीवर चालत असल्यामुळे प्रवास महागण्याची शक्यता आहे. तसेच, पीएनजी दरवाढीमुळे गृहिणींचे महिन्याचे अंदाजपत्रकही कोलमडू शकते. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या किंमतीत वाढ केली असून नवे दर आज, मंगळवारपासून अमलात येतील. सीएनजी दीड रुपयांनी, तर पीएनजी एक रुपयाने महाग झाले आहे.

हे सुद्धा वाचा

प्रवास महागण्याची शक्यता

मुंबईकरांना नव्या दरानुसार एक किलो सीएनजीसाठी ७५ रुपये तर घरगुती पीएनजीसाठी ४८ रुपये मोजावे लागतील. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजीचे दर कमी असले तरी मुंबईतील बऱ्याच टॅक्सी व रिक्षा सीएनजीवर चालत असल्यामुळे प्रवास महागण्याची शक्यता आहे.रिक्षा टॅक्सी चालकांकडून प्रवासी भाडे देखील वाढले पाहिजे अशी मागणी आता करण्यात येत आहे.

दरवाढीचे कारण काय?

महानगर गॅसने याविषयीची माहिती दिली आहे. त्यांनी दरवाढीचे कारण दिले आहे. त्यानुसार, सीएनजी आणि घरगुती पाईप नैसर्गिक गॅस, पीएनजीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी महानगर गॅसला कसरत करावी लागत आहे. बाजार मूल्याआधारीत खरेदी होत असल्याने त्यांना दरवाढ करावी लागली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त

सीएनजी आणि पीएनजी किंमतीत वाढ झाली असली तरी दोन्ही इंधन पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्त आहे. महानगर गॅसची सीएनजीची किंमत मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अनुक्रमे जवळपास 50 टक्क्यांनी आणि 17 टक्क्यांनी स्वस्त आहे.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.