दसऱ्याआधी महागाईचा आणखी एक झटका! सीएनजी, पीएनजीच्या दरात मोठी वाढ

पुणे, नाशिकनंतर मुंबईचाही नंबर! जाणून घ्या मुंबईत नेमकी सीएनजी आणि पीएनजीच्या दरात किती वाढ झाली?

दसऱ्याआधी महागाईचा आणखी एक झटका! सीएनजी, पीएनजीच्या दरात मोठी वाढ
सीएनजी पुन्हा महागला!
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 7:57 AM

संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली : मुंबईकरांना (Mumbai CNG Rate Today) दसऱ्याच्या आधी महागाईचा मोठा झटका बसला आहे. सीएनजी (CNG Rates) आणि पीएनजीच्या (PNG Rates) किंमतीत मोठी वाढ करण्यात आलीय. सीएनजीचे दर प्रतिकिलो तब्बल 6 रुपयांनी तर पीएनजीच्या दरात 4 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे घरगुती गॅसची किंमत चार रुपयांनी वाढलीय. ऐन सणासुदीत सामान्य नागरिकांना आता महागाईची झळ बसणार आहे.

का वाढली किंमत?

मुंबई आणि परिसरामध्ये सीएनजी आणि पीएनजीचे वाढीव दर आजपासून लागू करण्यात आलेत. वाढीव दरांमुळे मुंबईत सीएनजीची किंमती 86 रुपये प्रति किलो झाली आहे. तर पीएनजी गॅससाठी 52.50 रुपये प्रतिकिलो इतका दर आकारला जाणार आहे. 1 ऑक्टोबरपासून नैसर्गिक वायूच्या आयात किंमतीत तब्बल 40 टक्के वाढ झाली आहे. त्याचा परिणाम सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतींवर झालाय.

कुठे किती दर?

सोमवारी पुण्यामधील सीएनजीच्या दरातही 4 रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे पुण्यातील सीएनजीचे दर हे 91 रुपये प्रतिकिलो झाले होते. त्यानंतर आता मुंबईतही सीएनजीच्या दरात मोठी वाढ करण्यात आलीय.

हे सुद्धा वाचा

पुण्याच्या तुलनेत मुंबईतील सीएनजीची किंमत 2 रुपये अधिक वाढवण्यात आलीय. मुंबई आणि पुण्यापेक्षाही सीएनजीची किंमत ही नाशिकमध्ये सर्वाधिक आहे. नाशिकमध्ये सीएनजी प्रतिकिलो 95.50 रुपये इतका महाग झालाय.

पाहा लाईव्ह घडामोडी : VIDEO

सीएनजीही शंभरी गाठणार?

पेट्रोल, डिझेलनंतर आता सीएनजी देखील शंभरी गाठण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. नैसर्गिक वायूच्या किंमतीत झालेली वाढ पाहता येत्या काळात सीएनजी आणखी महागेल, अशी शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती. त्यानुसार ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच दरवाढ करण्यात आलीय.

सीएनजीच्या किंमती वाढल्यामुळे त्याचा फटका दळणावळणावरही होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या गाड्या, टॅक्सी, रिक्षा, टेम्पो यांच्यासह अनेक बसही सीएनजीवर चालवल्या जातात. त्यांच्यावर सीएनजीच्या वाढलेल्या किंमतीचा थेट परिणाम जाणवणार आहे. सीएनजी महाग झाल्यानं अनेक गोष्टी महागतील, अशी शक्यता वर्तवली जातेय.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.