VIDEO | मुंबईत बीकेसीजवळ साडेचार फुटी नाग सापडला, सुटकेचा थरार कॅमेरात कैद
मुंबईतील बीकेसी भागात सेबी भवनजवळ साडेचार फुटी नाग सापडला होता (Cobra Snake Mumbai BKC)
मुंबई : वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील सेबी भवनजवळ साडेचार फुटी नाग सापडल्याची घटना समोर आली आहे. सर्पमित्रांना याची माहिती दिल्यानंतर नागाची सुखरुप सुटका करण्यात आली. परंतु सर्पदर्शनानंतर सुरक्षारक्षकांची पाचावर धारण बसली होती. नागाच्या सुटकेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. (Cobra Snake found at Mumbai BKC)
मुंबईतील बीकेसी भागात सेबी भवनजवळ साप दिसल्याची माहिती वापरा (W.A.P.R.A) संस्थेचे सर्पमित्र अतुल कांबळे यांना देण्यात आली होती. ही बातमी मिळताच सर्पमित्र अतुल कांबळे यांच्यासह सर्पमित्र किशोर प्रभू हे घटनास्थळी गेले.
साडेचार फूट लाबींचा नाग
सेबी भवनाच्या मागील बाजूला असणाऱ्या पटांगणामध्ये झाड आणि कुंड्यांच्या मध्ये एक भला मोठा नाग होता. साडेचार फूट लाबींचा हा विषारी सर्प दडून बसला होता. त्यामुळे तेथील सुरक्षा रक्षक अतिशय भयभीत झाले होते.
मुंबई रेंज वन विभागाच्या ताब्यात
सर्पमित्र अतुल कांबळे आणि सर्पमित्र किशोर प्रभू यांनी घटनेचं गांभीर्य औळखून नागाची सुटका केली. त्यामुळे तेथील सुरक्षा रक्षकांनीही मोकळा श्वास घेतला. पुढे या सापाला ठाणे येथील मुंबई रेंज वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर त्याची नैसर्गिक अधिवासात मुक्तता केली जाईल.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
VIDEO | भंडाऱ्यात एकाच घरी निघाले तीन विषारी साप, पाहा थरारक व्हिडीओ
VIDEO | आधी तो डुलायला लागला, नंतर नागोबाही डुलायला लागला, नंतर नंतर नागोबा चांगलाच चवताळला
(Cobra Snake found at Mumbai BKC)