आरेमधील झाडांची कत्तल केल्याप्रकरणी चौकशी होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश
मुंबई मेट्रो कारशेडच्या आरेतील कामाला स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता झाडं कापण्याच्या निर्णयाची चौकशी करण्याचेही आदेश दिले आहेत (Committee for inquiry of tree cutting of Aarey Forest).
मुंबई : मुंबई मेट्रो कारशेडच्या आरेतील कामाला स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता झाडं कापण्याच्या निर्णयाची चौकशी करण्याचेही आदेश दिले आहेत (Committee for inquiry of tree cutting of Aarey Forest). यासाठी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे आता समितीच्या चौकशीत काय समोर येणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे (Committee for inquiry of tree cutting of Aarey Forest).
झाडं कापण्याचा निर्णय कोणी घेतला, त्याची प्रक्रिया काय होती, यात नियमांचं पालन झालं का, रात्रीच्यावेळी झाडं कापणे आणि नागरिकांवर बळाचा वापर करणं अशा अनेक मुद्द्यावर संबंधित समिती आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. या समितीला चौकशी करुन अहवाल सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई मेट्रो कारशेडसाठी 2100 झाडांची कत्तल करण्यात आली होती. याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चार सदस्यांची समिती गठीत करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे आरेच्या जमिनी व्यतिरिक्त इतर कोणती जागा कारशेडसाठी योग्य आहे याचाही अहवाल ही समिती देणार आहे. त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीवर देखील निर्णय होणार असल्याचं दिसत आहे.