नुपूर शर्मा विरोधात ठोस कारवाई करा अन्यथा लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरू; ऑल इंडिया इमाम इमाम कौन्सिलचा इशारा

ऑल इंडिया इमाम कौन्सिलच्य पदाधिकाऱ्यांनी नूपुर शर्मा यांना अटकेसाठी दिलेल्या वेळेवर आमची हरकत आहे असंही त्यांनी सांगितले. नूपुर शर्माला 22 किंवा 15 दिवसाचा कालावधी का आणि कशासाठी? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे.

नुपूर शर्मा विरोधात ठोस कारवाई करा अन्यथा लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरू; ऑल इंडिया इमाम इमाम कौन्सिलचा इशारा
भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचं पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त विधानाबद्दल तात्काळ कारवाई कराImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 9:54 PM

मुंबई : प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (BJP spokesperson Nupur Sharma) वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. मुंबई, ठाणे, भिवंडी आणि मुंब्रा पोलीस ठाण्यातदेखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा पोलिसांनी ई-मेलद्वारे समन्स (Summons by e-mail) पाठवत शर्मा यांना नोटीस बजावून 22 जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र यावेळी ऑल इंडिया इमाम कौन्सिलचे अध्यक्ष, मुफ़्ती अब्दुल बासित यांनी आम्ही समजाला शांततेचं आवाहन केलं आहे.

नूपुर शर्मासारख्या (Nupur Sharma) व्यक्तींवर तातडीने करण्याची मागणी करत नुपूर शर्माला तातडीने अटक झाली नाही तर ऑल इंडिया इमाम कमिटी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

नूपुर शर्माला 22 किंवा 15 दिवसाचा कालावधी का

ऑल इंडिया इमाम कौन्सिलच्य पदाधिकाऱ्यांनी नूपुर शर्मा यांना अटकेसाठी दिलेल्या वेळेवर आमची हरकत आहे असंही त्यांनी सांगितले. नूपुर शर्माला 22 किंवा 15 दिवसाचा कालावधी का आणि कशासाठी? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे.

अन्यथा तीव्र आंदोलन

नूपुर शर्मा यांना तातडीने अटक करण्याच्या सूचना पोलीस कमिशनर किंवा डीआयजी यांनी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. पोलिसांच्या कारवाईवर आम्हाला आक्षेप नसून त्यांना अटक करण्यासाठी दिलेल्या वेळेवर आमची हरकत आहे. कारण या कालावधीत आरोपी पळून जाण्यासाठी किंवा अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करु शकतो अशी शक्यता आहे असं सांगण्यात आले आहे.

सोशल मीडियाद्वारे आरोपीला सपोर्ट

अनेकजण सोशल मीडियाद्वारे आरोपीला सपोर्ट करत वातावरण कलुषित करत आहेत. यामुळे देशाचा अपमान होत आहे. फक्त हा आमच्या मातीचा अपमान नाही तर हा देशाचा अपमान असून या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो म्हणत त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

ऑल इंडिया इमाम कमिटी रस्त्यावर

महत्वाच्या पदावर बसलेले जबाबदार व्यक्तीवर यामुळे ताशेरे ओढले जात असल्याने नूपुर शर्मासारख्या व्यक्तींवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. नुपूर शर्मा यांना तातडीने अटक न झाल्यास ऑल इंडिया इमाम कमिटी रस्त्यावर उतरुन या घटनेचा निषेध करणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा अपमान

अरेबियन देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा अपमान करण्यात आला असून त्यांनी त्यांच्या पद्धतीने भारतात घडलेल्या प्रकाराचा निषेध केला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.