Pruthaviraj Chavan : एकदा मशीन हातात येऊ द्या, त्यात गुप्त… पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा काय?
Pruthaviraj Chavan on EVM : महाविकास आघाडीकडून निवडणूक आयोगावर एकामागून एक हल्ले सुरूच असताना अनेक पराभूत उमेदवारांनी आता फेर मतमोजणीसाठी मोठी रक्कम जमा केली आहे. त्यातच आता माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराजबाबा यांनी पण मोठा बॉम्ब टाकला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमधील मतदानातील तफावत सध्या कळीचा मुद्दा झाला आहे. अनेक गावात मतदारांपेक्षा मतदानाचा टक्का अधिक असल्याचे समोर आल्याने विरोधकांच्या संशयाला जागा मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे. 72 लाख मते कधी आणि कशी वाढली असा निशाणा नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर साधला आहे. महाविकास आघाडीतून निवडणूक आयोगावर हल्ले वाढले आहेत. तर दुसरीकडे पराभूत उमेदवारांनी आता फेर मतमोजणीचा पर्याय निवडला आहे. त्यासाठी मोठी रक्कमही मोजली आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराजबाबा यांनी पण मोठा बॉम्ब टाकला आहे.
लोकशाही वाचवण्यासाठी बाबा आढावांचं आंदोलन
जे निकाल लागले आहेत ते अनपेक्षित होते. मी जवळ जवळ 7 सार्वत्रिक निवडणुका लढलो आहे. कार्यकर्ताना अंदाज येत असतो, असे ते म्हणाले. लोकशाही वाचवण्यासाठी बाबा आढाव यांनी आंदोलन केलं. बाबा आढाव यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी मी मुंबईहून येथे आल्याचे त्यांनी सांगीतले.
सत्ता बदलाचा प्रत्येकाला विश्वास
5 महिन्यापूर्वी महाविकास आघाडीला मोठ्या जागा मिळाल्या होत्या. पण विधानसभेला इतका मोठा बदल होईल असं दिसत नाही, असे चव्हाण म्हणाले. प्रत्येकाला आत्मविश्वास होता सत्ता बदल होणार आहे. पक्ष फुटीचा जो विषय झाला त्याचा काहीच फरक पडला नाही याचा विश्वास बसत नाही. देशात लोकशाही आहे. निवडणुक फ्री आणि फेअर होणं आवश्यक आहे.
आयुक्त बदलण्याचा निर्णयावेळीच आला अंदाज
पंतप्रधानानी निवडणूक आयुक्त बदलण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्हाला अंदाज आला होता. द्वेष पसरवणारी भाषण मोदी योगी यांचे कडून करण्यात आली त्यांच्यावर कारवाई केली नाही. निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. Evm मशीनवर जनतेचा विश्वास राहिला नाही. फेर पडताळणीचा मला वाटतेय काही फायदा होणार नाही, असे ते म्हणाले. माझी मागणी आहे, सर्वच्या सर्व VVPAT च्या चिठ्या मोजायला हव्यात अशी मागणी त्यांनी केल. सरकार घाबरत असल्यानेच जनतेचा संशय बळावत असल्याचा आरोप त्यांनी केला.
VVPAT मोजा
निवडणूक आयोगाने EVM मशीन तपासणीसाठी दिल्या पाहिजे. आंतरराष्ट्रीय समिती तपासणी केली पाहिजे. ईव्हीएम मशीन हातात भेटलं पाहिजे. त्या मशीन मध्ये काही गुप्त कोड आहे का ह्याची तपासणी झाली पाहिजे. जागतिक तज्ज्ञाकडून त्याची तपासणी झाली पाहिजे. त्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी लोकशाहीचा मुडदा पाडला
लोकशाहीचा यांनी मूडदा पाडला आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. निवडणुकीत पोलिसांचा गैरवापर केला गेलाय… पोलिसांकडून मतदान करून घेतलं. निवडणूक आयोग बोलवणार आणि लांबून मशीन दाखवणार आणि विचारणार पुरावा दाखवा. 5 टक्के मत मोजून काय फायदा होणार नाही. आपल्या हातात मशीन नाही. या मशीनमध्ये काही गुप्त कोड, प्रोगाम फीट केला आहे का? हे तपासावं लागणार तरच खरी माहिती समोर येईल असे चव्हाण म्हणाले. यापूर्वी उद्धव ठाकरे यांना भाजपाला फसवलंय. एकनाथ शिंदे यांना फसवू नये असं वाटत होतं पण तस झाले आहे, असा टोला त्यांनी लगावला.
पैशांचा वारेमाप वापर
मी उपोषण केलंय. मी 1952 सालापासून निवडणुका पाहतोय. मी येवढा पैश्याचा वापर कधी पहिला नाही माला हे अजब वाटत. अदानींना अमेरिकेतली कोर्टात पकड वॉरंट काढलं आहे. निवडणुकीतील तांत्रिक दोष हा माझ्यासाठी गौण आहे. पण परिकीय हस्तक्षेप झालाय का नाही? मोदी कित्येक दिवस पत्रकारांसोबत बोलायला देखील तयार नाहीत. सरकारने एकदा आयोग नेमला पाहिजे आणि तपास केला पाहिजे. परकीय हस्तक्षेप आतापर्यंतच्या निवडणुकीत कधी झालाय का? हे सरकार मस्तावले आहे. हे धोकादायक आहे, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांनी केले आहे.