पटोले VS थोरात, काँग्रेस हायकमांड अ‍ॅक्शन मोडवर, आता मुंबईत खलबतांची मालिका

महाराष्ट्र काँग्रेसमधील (Maharashtra Congress) अंतर्गत चव्हाट्याची आता थेट काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडकडून गंभीरपणे दखल घेतली गेलीय. त्यामुळेच आता काँग्रेसच्या गोटात महत्त्वाच्या घडामोडींना वेग आलाय.

पटोले VS थोरात, काँग्रेस हायकमांड अ‍ॅक्शन मोडवर, आता मुंबईत खलबतांची मालिका
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 7:27 PM

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसमधील (Maharashtra Congress) अंतर्गत चव्हाट्याची आता थेट काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडकडून गंभीरपणे दखल घेतली गेलीय. त्यामुळेच आता काँग्रेसच्या गोटात महत्त्वाच्या घडामोडींना वेग आलाय. विशेष म्हणजे या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील (H K Patil) येत्या 12 फेब्रुवारीला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एच के पाटील काँगेसमधील (Congress) नेत्यांशी चर्चा करणार आहेत. या दरम्यान ते काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचीदेखील भेट घेणार आहेत. याशिवाय बैठकांसंदर्भातही बैठकीचं नियोजन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल नाही, असंच दिसतंय. काँग्रेसमध्ये थेट दोन गट पडल्याचं चित्र आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात संघर्ष बघायला मिळतोय.

नाना पटोले हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. पण त्यांचा हाच रोखठोक स्वभाव अंतर्गत कलहाला कारणीभूत ठरत आहे की काय? अशी चर्चा आहे. खरंतर हा अंतर्गत कलह उफाळण्यामागील कारण ठरलेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यान घडलेल्या घडामोडी.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

आमदार सत्यजीत तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी काँग्रेसकडून देण्यात आली होती. पण सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही.

याउलट सत्यजीत तांबे यांनी अर्ज दाखल केला आणि सुधीर तांबे यांनी सत्यजीत यांना पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर झाला.

देवेंद्र फडणवीस यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण

याशिवाय आपण भाजपचा देखील पाठिंबा मागू, असं सत्यजीत तांबे म्हणाले होते. तसेच या निवडणुकीआधी सत्यजीत यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला भाजप नेते देवेंद्र फडणवीस आले होते.

यावेळी त्यांनी सत्यजीत तांबे यांना संधी द्या. नाहीतर आमचं त्यांच्याकडे लक्ष आहे, असं विधान केलं होतं. त्यामुळे वेगवेगळे राजकीय कयास बांधले जात होते.

सत्यजीत तांबे यांचे आरोप

याच सगळ्या चर्चांमुळे अखेर काँग्रेस हायकमांडने देखील तांबे पिता-पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. या निवडणुकीत सत्यजीत तांबे निवडून आले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळा घटनाक्रम सांगितला. आपल्याला चुकीचा एबी फॉर्म पाठवण्यात आला होता, असा आरोप त्यांनी केला.

नाना पटोले यांचं प्रत्युत्तर

सत्यजीत तांबे यांच्या आरोपांना नाना पटोले यांनीदेखील उत्तर दिलं. आपल्याकडे सर्व मसाला आहे. त्यामुळे कुटुंबातील वाद पक्षावर आणू नका आणि वादावर पडदा टाका, असं आवाहन नाना पटोले यांनी केलं होतं.

बाळासाहेब थोरात यांचं हायकमांडला पत्र

दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस हायकमांडला पत्र पाठवत नाना पटोले यांची तक्रार केली. नाना पटोले यांच्यासोबत काम करणं आता कठीण होऊन बसलं असल्याचं ते पत्रात म्हणाले.

‘सामना’ अग्रलेखात नाना पटोलेंवर निशाणा

विशेष म्हणजे नाना पटोले यांच्यावर आज शिवसेनेचं मुखपत्र असेलल्या ‘सामना’च्या अग्रलेखातूनही निशाणा साधण्यात आलाय. पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडी सरकारने पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला असता, असा दावा अग्रलेखात केला.

विजय वडेट्टीवार दिल्लीत

दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आज दिल्लीत गेले आहेत. त्यांनी आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. याशिवाय काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन नाना पटोले यांच्याविषयी तक्रार केली होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.